बिडीओंची ‘स्वच्छता ही सेवा’ ठरली आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:38 PM2017-09-21T23:38:09+5:302017-09-21T23:38:22+5:30

राबविण्यात येणाºया स्वच्छता ही सेवा या अभियानाची पाहणी करण्यासाठी पवनीच्या खंडविकास अधिकारी अनिता तेलंग व आरोग्य विस्तार अधिकारी आर.एस. पाटील यांनी....

Ideal for the 'cleanliness service' of the bidis | बिडीओंची ‘स्वच्छता ही सेवा’ ठरली आदर्श

बिडीओंची ‘स्वच्छता ही सेवा’ ठरली आदर्श

Next
ठळक मुद्देस्वच्छता अभियान : अधिकाºयांनी कोंढा गावातील रस्ते, थोर पुरुषांचे पुतळे केले स्वच्छ


चरणदास बावणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : राबविण्यात येणाºया स्वच्छता ही सेवा या अभियानाची पाहणी करण्यासाठी पवनीच्या खंडविकास अधिकारी अनिता तेलंग व आरोग्य विस्तार अधिकारी आर.एस. पाटील यांनी कोंढा गावाला भेट देऊन स्वच्छतेविषयी कुटुंब भेट व गावातील थोर पुरूषांचे पुतळे स्वत: स्वच्छ करीत पाण्याने धुऊन काढले.
नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी लोकसहभागातून श्रमदान करून परिसर स्वच्छ व्हावा, शौचालय स्वच्छ राहावे यासाठी स्वच्छता ही सेवा अभियान ग्रामपंचायत कोंढातर्फे राबविण्यात येत आहे. यासाठी सरपंच शिला देविदास कुर्झेकर, ग्रामविकास अधिकारी एम.ए. बावणकर, उपसरपंच धनराज जांभूळकर व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी गावात जाऊन स्वच्छतेविषयी मार्गदर्शन व सभा घेत आहेत. या अभियानाची पाहणी करण्यासाठी २० सप्टेंबरला पवनी पं.स. च्या खंडविकास अधिकारी अनिता तेलंग यांनी कोंढा गावाला भेट दिली. त्यांच्या सोबत आरोग्य विस्तार अधिकारी आर.एस. पाटील व कर्मचारी होते. त्यांनी सरपंच शिला देविदास कुर्झेकर, उपसरपंच धनराज जांभूळकर, ग्रामविकास अधिकारी एम.ए. बावनकर व ग्रामपंचायत सदस्यांना घेऊन गावातील सार्वजनिक ठिकाणाला भेट दिली. हनुमान मंदिरासमोर हातपंपाच्या आजुबाजुचा परिसर खंडविकास अधिकारी तेलंग स्वत: स्वच्छ केला. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याची पाणी घालून साफसफाई केली. कुटुंबांना भेट देऊन शौचालयाची पाहणी केले ते स्वच्छ करून दिले. अनेक शौचालयाचे दरवाजे त्यांनी लावून दिले. या कार्यामुळे अनेक गावकरी प्रभावित झाले. खंड विकास अधिकारी तेलंग यांनी स्वत: मंदिरासमोरील कचरा गोळा केला आणि एक आदर्श करून दिला. स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे गावकरी कौतूक करीत होते. स्वच्छतेची चळवळ गावात बळकट करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची रॅली गावात काढण्यात येणार असल्याचे सरपंच शिला कुर्झेकर यांनी सांगितले. स्वच्छतेला प्राधान्य देत बीडीओ अनिता तेलंग यांनी कोंढा गावाला भेट देऊन स्वत: सार्वजनिक ठिकाणी कचरा गोळा केला, राष्ट्रसंताच्या पुतळ्याची स्वच्छता केली. शौचालय स्वच्छ केले. यामुळे निश्चित गावातील लोकात स्वच्छतेची चळवळ निर्माण होऊन गावकºयांना स्वच्छतेची सवय लागण्यास मदत होईल. गावात सार्वजनिक ठिकाणी स्वत: स्वच्छता मोहिम राबविल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये त्यांनी ग्रामपंचायत सदस्य व गावकºयांना मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांनी स्वच्छतेची चळवळ बळकट करून गावात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. आरोग्य निरोगी राहण्यासाठी यास प्रथम प्राधान्य देण्याचे आवाहन केले. संचालन ग्रामविकास अधिकारी एम.ए. बावनकर यांनी तर आभार अरुण कुर्झेकर यांनी मानले.

Web Title: Ideal for the 'cleanliness service' of the bidis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.