ग्रामीण रुग्णालयावर धडकले शेकडो तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:12 PM2018-08-14T23:12:39+5:302018-08-14T23:13:01+5:30

सबका साथ सबका विकासाचा नारा देणाऱ्या शासनाचा आरोग्य सेवेवर अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने सामान्यातला सामान्य माणूस प्रभावित झाला आहे. गोरगरीब आरोग्य सेवेपासून मुक्त असल्याचे वास्तव पालांदुरातील ग्रामीण रुग्णालयात अनुभवायला मिळाले. रुग्णांची होत असलेली गळचेपी असह्य झाल्याने अख्खी तरुणाई शेकडोंच्या संख्येने माजी जि.प. सदस्य भरत खंडाईतच्या सोबतीने ग्रामीण रुग्णालयात धडकले.

Hundreds of youths hit the rural hospital | ग्रामीण रुग्णालयावर धडकले शेकडो तरुण

ग्रामीण रुग्णालयावर धडकले शेकडो तरुण

Next
ठळक मुद्देआरोग्य व्यवस्था खिळखिळी : १०८ रुग्णसेवेचा दुरूपयोग

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : सबका साथ सबका विकासाचा नारा देणाऱ्या शासनाचा आरोग्य सेवेवर अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने सामान्यातला सामान्य माणूस प्रभावित झाला आहे. गोरगरीब आरोग्य सेवेपासून मुक्त असल्याचे वास्तव पालांदुरातील ग्रामीण रुग्णालयात अनुभवायला मिळाले. रुग्णांची होत असलेली गळचेपी असह्य झाल्याने अख्खी तरुणाई शेकडोंच्या संख्येने माजी जि.प. सदस्य भरत खंडाईतच्या सोबतीने ग्रामीण रुग्णालयात धडकले.
पालांदुरात चार कोटीची ग्रामीण रुग्णालयाची इमारत सर्वसोईनिशी दिमाखात उभी आहे. निवासी सदनिकांचे सुमारे २५ लक्ष रुपयाचे बांधकाम धडाक्यात सुरु आहे. मात्र यात वैद्यकीय अधीक्षकासह २ डॉक्टरांचे पद रिकामे आहे. परिचारिका रक्ततपासणी तज्ज्ञ, तपासणीचे साहित्य, प्रसुतीकरिता लागणारे साहित्य, औषधसाठा, अपेक्षित प्रमाणात उपलब्ध नाही. ३० खाटांचे मंजूर रुग्णालयात केवळ पाच खाटा आहेत. रक्तदाब, रक्तातील साखर, मुत्र तपासणी कर्मचाºयांअभावी होत नाही. रोजंदारीच्या आधारे आरोग्य सेवा कशीतरी पुरविली जाते. अपेक्षित औषधसाठा मागूनही मिळत नाही. गोरगरीबांनी करावे काय? असा प्रश्न विचारीत तरुणाई रोष व्यक्त करीत होती. घटनास्थळावरूनच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.थोरात यांच्याशी फोनवर वार्तालाप करीत १०८ रुग्णसेवेचे झालेले तीनतेरा व ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे वास्तव चित्र कळविण्यात आले. शवविच्छेदनगृह असूनही तालुका व जिल्ह्याला शवविच्छेदनाकरिता हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. हे उइचत नसल्याचे ठाणेदार अंबादास सुनगार यांनी तरुणांना लक्षात आणून दिले. जिल्हा पातळीवर पत्रव्यवहार करुनही न्याय मिळत नसल्याचे सांगण्यात आले.
१०८ रुग्णसेवेचा वाढता दुरूपयोग चिंतनीय
१०८ रुग्णसेवा गरीबांकरिता व अपघाताकरिता अत्यंत मोलाची व महत्वाची ठरत आहे. १०८ मुळे कित्येकांना जीवनदान मिळाले आहे. मात्र या व्यवस्थेवर संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याने सेवा खासगीत विकत असल्याचा आरोप करण्यात आला. १०८ ला तीन डॉक्टर सेवेत असून डॉ.अभय हजारे यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे डॉ.ललीत नाकाडे यांनी सांगत त्यांच्याऐवजी मेश्राम या सेवेत असल्याचे सांगितले.

Web Title: Hundreds of youths hit the rural hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.