पालकमंत्र्यांनी केली धानपिकाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:24 AM2018-10-24T00:24:06+5:302018-10-24T00:24:44+5:30

तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे. दरम्यान पालकमंत्री राजकुमार बडोले आणि आ. संजय पुराम यांनी तालुक्यातील विविध गावातील शेतात जावून पावसाअभावी फटका बसलेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.

 Guardian Minister reviewed Dhanpi | पालकमंत्र्यांनी केली धानपिकाची पाहणी

पालकमंत्र्यांनी केली धानपिकाची पाहणी

Next
ठळक मुद्देदुष्काळ सदृृृृृृृश परिस्थितीचा घेतला आढावा : शेतकऱ्यांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान पालकमंत्री राजकुमार बडोले आणि आ. संजय पुराम यांनी तालुक्यातील विविध गावातील शेतात जावून पावसाअभावी फटका बसलेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
तालुक्यातील कोटजमुरा, हलबीटोला, धानोली, गिरोला या गावातील परिसरात शेतात जाऊन बडोले आणि पुराम यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाने दगा दिल्याने हाती आलेली पीक गमविण्याची पाळी आली असल्याचे सांगितले. तसेच याचा परिणाम उत्पादनावर होणार असून केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण असल्याचे सांगितले. अशात सालेकसा तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली. वरथेंबी पावसावर अंबलबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली. बडोले व पुराम यांनी शेतकºयांच्या समस्या ऐकूण घेत याचा पाठपुरावा करुन नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या वेळी विरेंद्र अंजनकर, मनोज दमाहे, संजू कटरे, मनोज बोपचे, तहसीलदार भंडारी, कृषी अधिकारी भोसले व इतर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

Web Title:  Guardian Minister reviewed Dhanpi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.