तुमसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 01:34 AM2019-06-22T01:34:06+5:302019-06-22T01:35:03+5:30

सन २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत भंडारा जिल्ह्यातून तुमसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला प्रथम क्रमांकाची मते मिळाली होती. सन १९९० मध्ये शिवसेनेचाच उमेदवार येथे पक्षाने उभा केला होता. त्यामुळे भंडारा-पवनी विधानसभा व्यतिरिक्त तुमसर-मोहाडी विधानसभा मतदार संघात शिवसेनेला पुन्हा उमेदवारी द्यावी, ......

Give Tamsar assembly constituency to Shivsena | तुमसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला द्या

तुमसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला द्या

googlenewsNext
ठळक मुद्देपत्रपरिषद : पक्ष प्रमुखांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ जाणार मुंबईला

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सन २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत भंडारा जिल्ह्यातून तुमसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला प्रथम क्रमांकाची मते मिळाली होती. सन १९९० मध्ये शिवसेनेचाच उमेदवार येथे पक्षाने उभा केला होता. त्यामुळे भंडारा-पवनी विधानसभा व्यतिरिक्त तुमसर-मोहाडी विधानसभा मतदार संघात शिवसेनेला पुन्हा उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे तथा तुमसर-मोहाडी येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेतून केलीे.
शिवसेनेच्या तुमसर येथील संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या वर्धापनदिनी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तुमसर-मोहाडी विधानसभेवर आपला दावा केला.
सुधाकर कारेमोरे म्हणाले, सन १९९० मध्ये शिवसेनेचे उमेदवार मधुकर कुकडे यांनी युतीची पहिली निवडणूक तुमसर विधानसभेतून लढविली होती. येथे शिवसेनेचे जि.प. सदस्य, सभापती, पं.स. सदस्य, सभापती, सरपंच अनेक सेवा सहकारी संस्थेवर भगवे फडकले. नगरपरिषदेत नगरसेवक निवडून आले आहेत.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, जिल्हा संघटक लवकुश निर्वाण, शहर प्रमुख नितीन सेलोकर, तुमसर विधानसभा समन्वयक राजेश बुराडे, नितेश वाडीभस्मे, गोवर्धन मारवाडे, प्रविण गायधने, जिवन डोये, देवेंद्र वालुदे, ईश्वर भोयर, किशोर यादव, मोहनीष साठवणे, अमित मेश्राम, संजय डहाके, बुथ प्रमुख संजय झंझाड, सचिन मोहतुरे, नरेश कारेमोरे, महेन्द्र मेश्राम, नितीश पाटील, महेन्द्र चाचीरे, जनार्दन पात्रे आदी उपस्थित होते.

Web Title: Give Tamsar assembly constituency to Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.