विदेशी पक्ष्यांची पहिल्यांदाच नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 09:47 PM2019-01-18T21:47:28+5:302019-01-18T21:47:51+5:30

ग्रीनक्रॉस चळवळ भंडाराच्यावतीने सातोना येथील तलावावर केलेल्या पक्षी निरीक्षणात याठिकाणी मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी आढळून आले.

Foreign birds recorded for the first time | विदेशी पक्ष्यांची पहिल्यांदाच नोंद

विदेशी पक्ष्यांची पहिल्यांदाच नोंद

Next
ठळक मुद्देसातोना येथे दाखल : पक्ष्यांना पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रीनक्रॉस चळवळ भंडाराच्यावतीने सातोना येथील तलावावर केलेल्या पक्षी निरीक्षणात याठिकाणी मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी आढळून आले.
ग्रीनक्रॉस चळवळीचे संस्थापक अ‍ॅड. संजीव गजभिये यांच्या मार्गदर्शनात पक्षी निरीक्षक स्वप्नील वानखेडे, राकेश रामटेके सुदीप शहारे, डॉ. स्वप्नील धारगावे, प्रवीण कारेमोरे यांनी सातोना येथील तलावावर पक्षी निरीक्षण करुन पक्ष्यांच्या नोंदी केल्या.
याबाबत पक्षी तज्ज्ञ व माजी मानद वन्यजीव संरक्षक अ‍ॅड. संजीव गजभिये यांनी माहिती दिली की, सातोना तलावावर विदेशी पक्षी ग्रेलंस गुस (श्याम कदम), रेड क्रिस्टेड कोचार्ड (मोठी लालसरी), नार्दन शॉवलर (थापट््या बदक), कॉटन पिग्मी मुस (कानूक कादंब) सोबतच भारतीय पक्षी कुट (चांदवा), लेसर व्हिसलींग ट्लिस (अडई), पर्पल मूर हेज (जांभही पानकोंबडी), पिजन टेल जकाना यासह अन्य पक्षी आढळून आले. या तलावावर यापूर्वी विदेशी पक्षी आल्याची कोणतीही नोंद नसल्याचेही सांगितले.
भंडारा जिल्ह्यातील तलावावर दिवसेंदिवस विदेशी तसेच दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदी वाढत आहेत. गावातील तलावांवर सुध्दा विदेशी पक्षी येत आहेत. जिल्ह्यासाठी ही बाब भूषणावह असून वनविभागाने हौसी पक्षी निरीक्षकांकडून या नोंदीची माहिती घ्यावी. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव- बोड्या असून या तलावाचे व बोड्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वनविभागाने शासनाकडे पाठपुरावा करावा. तलावावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून ते त्वरित काढण्यात यावे अशी मागणी पक्षी निरीक्षकांकडून होत आहे.

Web Title: Foreign birds recorded for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.