पाच वर्षांपासून पुलाचे बांधकाम अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:07 PM2018-07-15T22:07:44+5:302018-07-15T22:08:51+5:30

लाखनी तालुक्यातील चुलबंद खोºयातील पालांदूर शेजारील पाथरी गाव विकासापासून कोसो दूर आहे. राजकारण्यांचा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे अख्खे गाव शासकीय योजनांपासून वंचित आहे. पाथरीवासीयांची नाळ पालांदूरशी बांधली आहे. दैनंदिन गरजेकरिता पालांदुरला ये जा करावी लागते. मात्र ये जा करण्याकरिता या मार्गावरील चुलबंदला जोडणारा मोठा नाला आड येत असल्याने वर्षभर असह्य त्रास सहन करीत प्रवास करावा लागतो.

For five years the construction of the bridge was half | पाच वर्षांपासून पुलाचे बांधकाम अर्धवटच

पाच वर्षांपासून पुलाचे बांधकाम अर्धवटच

googlenewsNext
ठळक मुद्देनिवेदनाला केराची टोपली : विद्यार्थी, शेतकऱ्यांना सुमार फटका, पाथरी-पालांदूर मार्गावरील बांधकाम

मुखरु बागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर (चौ.) : लाखनी तालुक्यातील चुलबंद खोºयातील पालांदूर शेजारील पाथरी गाव विकासापासून कोसो दूर आहे. राजकारण्यांचा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे अख्खे गाव शासकीय योजनांपासून वंचित आहे. पाथरीवासीयांची नाळ पालांदूरशी बांधली आहे. दैनंदिन गरजेकरिता पालांदुरला ये जा करावी लागते. मात्र ये जा करण्याकरिता या मार्गावरील चुलबंदला जोडणारा मोठा नाला आड येत असल्याने वर्षभर असह्य त्रास सहन करीत प्रवास करावा लागतो.
पाच वर्षापूर्वी याच नाल्यावर पुलिया बांधण्यात आला होता. पण पूर्णत्वास जाऊ शकला नसल्याने आजही तो पुल अर्धवटच पडलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गावाने राज्य परिवहन महामंडळाची बस सुद्धा गावात पाहली नाही. १२ वर्षांपासून गावात प्रादेशिक नळ योजना खितपत पडली असून उपयोगात नव्हती. मागील महिन्यात ती पूर्ववत होत गावाला नळाचे पाणी घरपोच मिळाले. गावाला रुंद व स्वच्छ रस्ते नाही. गावाला खातकुडा नाही आदी विविध समस्यांनी पाथरी नाला खीतपत आहे.
चुलबंद व नाल्याच्या किनाऱ्यावर गाव असल्याने भूजल बºयापैकी आहे. याच आरोग्यावर वार्षीक शेती हाच मुख्य व्यवसाय पाथरीवासीयांचा अधोरेखीत आहे. शेतीमुळे मुख्य बाजारपेठ पालांदूर आहे. मुलांना प्राथमिकस्तराच्या शिक्षणाकरिता पालांदुरचा आधार आहे. भर पावसात विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना नाल्याच्या प्रवाहातून प्रवास करावा लागतो. अन्यथा पाच कि.मी. चा फेरा घालत मऱ्हेगाव मार्गे किंवा खराशी लोहारा मार्गे पालांदूर गाठावे लागते. ही पाथरीवासीयांची व्यथा दूर करणारा देवदूत मिळेल का? प्रगत अत्याधुनिक काळात सुखसोयी गाववासीयांना मिळतील का? असे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने व लोकप्रतिनिधी कर्तव्यात कसूर करीत असल्याने पाथरीवासी विकासाच्या कोसो दूर आहेत. अर्धवट बांधून उभ्या असलेला पुल पुन्हा नव्याने बांधावा याकरिता निवेदने देण्यात आली. मात्र प्रशासनाने याकडे नेहमीच दुर्लक्ष आहे.

पाथरीवासीयांना नाल्यावरील अत्यंत महत्वाचा पुल आहे. पुलाच्या बांधकामाबाबत वारंवार प्रशासन, लोकप्रतिनिधींना सांगूनही फायदा झालेला नाही. गाव् ाविकासाकरिता शासकीय निधी अपेक्षित येत नसल्याने समस्या कायम आहेत.
-तुळशीदास फुंडे, सरपंच, पाथरी.
गाव विकासाकरिता वरिष्ठ नेते, पुढारी सहकार्य करीत नसल्याने विकासच नाही. आमदार, खासदारांना जागवल्याशिवाय मोठी निधी गावाला मिळू शकत नाही. केवळ निवडणुकांपूरतेच गावाला भेट देतात. आश्वासनांची खैरात वाटून पुन्हा पाच वर्ष विसरून जातात.
-श्रावण सपाटे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ता, पाथरी.
पालांदूर -पाथरी पुलामुळे दोन्ही गावाच्या शेतकºयांना शेती कसायला मोठी मदत होईल. पुलाच्या बांधकामाकरिता लोकप्रतिनिधींना वेठीस धरून कामाकरिता सातत्य महत्वाचे आहे. दोन गावांमध्ये नाळ जुळल्याने पालांदूर -पाथरी पुलाचे बांधकाम पुर्णत्वास येणे गरजेचे आहे.
-पंकज खंडाईत, पालांदूर.

Web Title: For five years the construction of the bridge was half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.