नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:36 AM2018-12-09T00:36:46+5:302018-12-09T00:37:23+5:30

शहराच्या बाहेरील डोंगरला रस्त्यालगत असलेल्या नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डच्या खोलीला शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास आग लागली. यात खोलीमधील सर्व प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाले. इमारतीला भेगा पडल्याने जवळपास १० लाखांचे नुकसान झाले.

A fire in the dumping yard of the city council | नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डला आग

नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डला आग

Next
ठळक मुद्देतुमसर येथील घटना : १० लाखांचे नुकसान, उलटसुलट चर्चेला पेव

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शहराच्या बाहेरील डोंगरला रस्त्यालगत असलेल्या नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डच्या खोलीला शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास आग लागली. यात खोलीमधील सर्व प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाले. इमारतीला भेगा पडल्याने जवळपास १० लाखांचे नुकसान झाले. ही आग लावली की लावण्यात आली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसात तक्रार झाली नव्हती.
यासंबंधी आरोग्य निरीक्षक जगदीश ठाकरे यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. यावरून डंपींग यार्डमधील सुरक्षा ऐरणीवर आली आहे. आज अचानक सकाळचा कचरा घेऊन गेलेला कंटेनर डम्पिंग यार्डला गेले असता त्याला आगीचे धूर निघताना दिसले. त्यानंतर त्यांनी आरोग्य निरीक्षक जगदीश ठाकरे यांना माहिती दिली. त्यांनी अग्नीशमन दलाला माहिती देऊन घटनास्थळ सांगितले. अग्नीशमन दलाने आग विझविली. अन्यथा ती आग दुसऱ्या इमारतीला ल ा गली असती. डंपींग यार्डच्या बाजूला असलेल्या शेतात धानाचे पुंजणे ठेवलेले आहे. ती आग लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता. आगीमुळे डंपींग यार्डच्या इमारतीला भेगा पडल्या आहेत. या डंपींग यार्डमध्ये शहरातील घनकचरा जमा केला जातो. या इमारतीत प्लास्कीटची पोती, खतनिर्मितीसाठी ठेवण्यात आली होती. ती पोती पूर्णत: खाक झाली. कचºयाचे कंत्राट शारदा महिला बचत गट हिवरा यांना आहे. आगीचे रहस्य काय या बाबीचा संभ्रम आहे.
चौकशी होणे गरजेचे
डम्पिंग यॉर्डला लागलेल्या आगीत जवळपास १० लाखांचे नुकसान झाले आहे. यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. डम्पींग यॉर्ड गावाबाहेर असल्याने येथे येणाºया जाणाऱ्यांची संख्या अत्यल्प असते. कंटेनर कचरा घेवून गेलेल्या कर्मचाऱ्याला ही आग दिसली असली तरी ही आग कुणी लावली असावी, हे मात्र एक कोडेच आहे. आगीची चौकशी केल्यास सत्यता सामोर येवू शकते. नगर पालिका प्रशासनाने याविषयी सविस्तर चौकशी समिती गठित करून प्रकरणाचा उलगडा करण्याची गरज आहे. ऐन हिवाळ्यात ही आग लागणे म्हणजे काही तरी काळबेर असल्याचा संशय निर्माण होतो. आगीच्या सुरक्षेसाठी येथे कोणतीही उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. कंटेनर वाहकाच्या निदर्शनात आल्यामुळे परिसरात असलेल्या धानाचे पुंजणे जळता जळता बचावले. अन्यथा आधीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांवर संकट ओढावले असते. डम्पींग यॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिक जमा करण्यात आले होते. जप्तीच्या कारवाईतील ही प्लॉस्टिक असल्याची चर्चा तुमसर शहरात आहे. या आगीच्या चौकशीसाठी जिल्हाकाऱ्यांनी पुढाकार घेवून तोडगा काढण्याची गरज आहे.

Web Title: A fire in the dumping yard of the city council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.