विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून शिक्षकांनी दृष्टिकोन बदलावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:23 PM2017-11-23T23:23:01+5:302017-11-23T23:23:30+5:30

येणारा काळ सतत बदलत आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. तो २१ व्या शतकातील विद्यार्थी आहे. यासाठी २० व्या शतकातील शिक्षकांनी २१ व्या शतकातील आवाहने व किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या गरजा....

Find out the needs of the learners and change the attitude of the teachers | विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून शिक्षकांनी दृष्टिकोन बदलावा

विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून शिक्षकांनी दृष्टिकोन बदलावा

Next
ठळक मुद्देदत्तात्रय मेंढेकर यांचे प्रतिपादन : अविरत २०१७ प्रशिक्षणाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येणारा काळ सतत बदलत आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. तो २१ व्या शतकातील विद्यार्थी आहे. यासाठी २० व्या शतकातील शिक्षकांनी २१ व्या शतकातील आवाहने व किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून आपला दृष्टीकोन बदलावा, असे प्रतिपादन जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्था भंडाराचे डॉ. दत्तात्रय मेंढेकर यांनी केले.
२१ व्या शतकातील आवाहने व किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या गरजा समजून त्यांला प्रतिसाद देण्यासाठी, शिक्षकांच्या दृष्टीकोनात व कौशल्यांमध्ये वाढ होण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाद्वारे एक महत्वाकांक्षी सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास प्रशिक्षण अविरत २०१७ च्या दुसºया टप्प्याचे उद्घाटनआठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी उपशिक्षणाधिकारी गोवर्धन भोंगाडे, प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. अभय परिहार, तज्ज्ञ मार्गदर्शक नूतन कन्या विद्यालय भंडारा येथील सहायक शिक्षक कैलास कुरंजेकर, जिजामाता विद्यालय भंडारा येथील मुख्याध्यापक शशीकांत हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मेंढेकर पुढे म्हणाले, शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकात जो उत्साह असतो तोच उत्साह सेवानिवृृत्त होईपर्यंत टिकून राहणे आवश्यक आहे. माध्यमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला संबंधित शिक्षक हवाहवासा वाटावा, यासाठी शिक्षकाने जीव ओतून शिकवावे. शिक्षकांनी तणावमुक्त वातावरणात राहून आनंददायी शिक्षण द्यावे, महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात प्रथम क्रमांकावर कसा येईल यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. गोवर्धन भोंगाडे म्हणाले, विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शिक्षण देता यावे यासाठी शिक्षकांनी सतत वाचावे, आपल्या ज्ञानात भर पडावी यासाठी प्रयत्न करावे, शिक्षकांनी विद्यार्थ्यापेक्षा दहा पटीने ज्ञानात पुढे असायला पाहिजे. डॉ. अभय परिहार म्हणाले, किशोरवयीन मुलांची वादळी अवस्था असते. त्यांच्या मनात संघर्षाची अवस्था निर्माण झाली असते. अशावेळी त्या विद्यार्थ्यासोबत शिक्षकांनी कसे वागावे याची जाणीव ठेवावी. राज्याचा के.आर. ए. वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. सर्वप्रथम दिवंगत सहायक शिक्षिका स्वाती घाटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संचालन अर्चना बेदरकर यांनी केले तर आभार रामकृष्ण वाडीभस्मे यांनी मानले. प्रशिक्षणात भंडारा तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व दोन शिक्षक यांचा सहभाग आहे.

Web Title: Find out the needs of the learners and change the attitude of the teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.