उसाच्या दरवाढीसाठी शेतकरी धडकले साखर कारखान्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:24 AM2017-11-16T00:24:12+5:302017-11-16T00:24:48+5:30

देव्हाडा स्थित मानस अ‍ॅग्रो साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी उसाचा हमी भाव वाढवून २,६०० रूपये देण्यात यावा,....

Farmers shivered for sugarcane price hike on sugar factory | उसाच्या दरवाढीसाठी शेतकरी धडकले साखर कारखान्यावर

उसाच्या दरवाढीसाठी शेतकरी धडकले साखर कारखान्यावर

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये असंतोष : कारखाना प्रशासनाचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : देव्हाडा स्थित मानस अ‍ॅग्रो साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी उसाचा हमी भाव वाढवून २,६०० रूपये देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी १५ नोव्हेंबरला दुपारी भारतीय किसान संघ भंडाराच्यावतीने कारखान्यावर धडक दिली. यावेळी शेतकरी व कारखाना प्रशासनाच्या बैठकीत भाव वाढ प्रकरणी कोणताही तोडगा निघाला नाही. २,३०० रूपयांपेक्षा अधिकची भाव वाढ करण्यासाठी पूर्ती उद्योग समूहाचे महाव्यवस्थापकांनी नकार दिल्याने चर्चा निष्फळ ठरली.
पूर्ती उद्योग समुहाद्वारे संचालित मानस अ‍ॅग्रो युनिट क्रमांक ४ देव्हाडा येथे आहे. यावर्षी कारखाना प्रशासनाने गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी उसाला हमी भाव २,३०० रूपये देण्याचे जाहीर केले होते. मात्र ऊसाला येणारा खर्च व मिळणारे उत्पन्न यात तफावत असल्याने ऊसाची शेती परवडणारी नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.
सन २०१७-१८ वर्षाचा गाळप हंगाम सुरु करण्याच्या निमित्ताने कारखान्यात आयोजित गव्हाण पुजनासाठी कारखाना प्रशासनाचे पदाधिकारी व अधिकारी हजर होते. ते निमित्त साधून भारतीय किसान संघाने उसाचा हमी भाव वाढविण्याची मागणी करीत धडक दिली. यावेळी कारखाना प्रशासन व किसान संघाच्या पदाधिकाऱ्यात झालेल्या बैठकीत सध्या हमी भाव २,३०० रूपयांवरून वाढविला जाऊ शकत नाही. निदान एक वर्ष सहकार्य करावे, असे सांगण्यात आल्याचे किसान संघाचे जिल्हा महामंत्री यादोराव मुंगमोडे यांनी सांगितले. बैठकीत तोडगा निघू न शकल्यामुळे शेतकºयांनी असंतोष व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व किसान संघाचे जिल्हा महामंत्री यादोराव मुंगमोडे, तुमसर तालुका अध्यक्ष पप्पू सेलोकर, मोहाडी तालुका अध्यक्ष सुधीर बांते, साकोली तालुका अध्यक्ष यादोराव कापगते, माजी पं.स. सदस्य कवळू मुंगमोडे, शेतकरी ताराचंद मुंगमोडे, भाऊराव बुद्धे, विश्वनाथ गोबाडे, हेमराज डोंगरवार, बाळकृष्ण डोंगरवार, रूपराम कापगते, हरिभाऊ कापगते यांनी केले.

Web Title: Farmers shivered for sugarcane price hike on sugar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.