साकोलीत शेतकऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:38 PM2017-11-23T23:38:50+5:302017-11-23T23:39:32+5:30

‘अच्छे दिन’चे स्वप्ने दाखवत भाजपने सत्ता काबीज केली. तीन वर्षाच्या काळात सरकारने शेतकºयासह सामान्य नागरिकांची फसवणूक केली.

Farmer's Front in Sakoli | साकोलीत शेतकऱ्यांचा मोर्चा

साकोलीत शेतकऱ्यांचा मोर्चा

Next
ठळक मुद्देहजारो शेतकरी सहभागी : सातबारा कोरा करा; शेतकरी संकटमोचन संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : ‘अच्छे दिन’चे स्वप्ने दाखवत भाजपने सत्ता काबीज केली. तीन वर्षाच्या काळात सरकारने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांची फसवणूक केली. शेतकºयांची कर्जमाफी असो किंवा महागाईचा प्रश्न भाजप सरकारने लोकहिताचा निर्णय घेतला नाही. यावर्षी तर नापिकीमुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अन्यथा राजीनामा द्यावा, अशी मागणी डॉ.अजय तुमसरे यांनी केली.
शेतकरी संकटमोचन संघटनेच्यावतीने विरली ते साकोली असा २० ते २३ नोव्हेंबर असे तीन दिवसीय पैदल मार्च काढण्यात आला होता. या मार्चचा गुरूवारला होमगार्ड परेड ग्राऊंडवर समारोप झाला, त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी आमदार सेवक वाघाये, संघटनेचे अध्यक्ष राम महाजन, उपाध्यक्ष अंताराम खोटेले, कार्याध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, नंदकिशोर समरीत, नरेश करंजेकर, पं.स. सदस्य सुषमा पटले, माजी सरपंच आगाशे उपस्थित होते.
यावेळी डॉ.तुमसरे म्हणाले, यावर्षी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पाऊस अत्यल्प पडल्यामुळे ५० टक्केच उत्पादन झाले आहे. बºयाच शेतकऱ्यांनी रोवणी केली नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने दोन्ही जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी केली.
शेतकरी संकटमोचन संघटना साकोलीने विरली ते साकोलीपर्यंत पैदल मार्च काढला होता.हा पैदल मार्च गुरूवारला साकोलीत पोहचला. होमगार्ड परेड ग्राऊंड येथील सभेत आयोजक व शेतकºयांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर हजारो शेतकऱ्यांचा हा पैदल मार्च उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला.
यावेळी लाखांदूर फाटा ते एकोडी रोड हा रस्ता काही वेळ बंद ठेवण्यात आला होता. मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहचताच उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, तहसीलदार अरविंद हिंगे हे कार्यालयाबाहेर येऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.
या मोर्चात साकोली तालुक्यातील शेतकरी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. सभेचे संचालन अशोक कापगते यांनी केले. सभेसाठी सुरेशसिंह बघेल, शैलेश गजभिये, अनिल टेंभरे, लिलाधर पटले यांच्यासह शेतकºयांनी सहकार्य केले.

Web Title: Farmer's Front in Sakoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी