आंतरराज्यीय सीमेवर पोलीस नियंत्रण कक्षाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 09:24 PM2018-11-20T21:24:18+5:302018-11-20T21:24:34+5:30

आंतरराज्यीय मार्गावरील खापा चौकात कापडी तंबुत पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. येथे फिरते पोलीस पथक सध्या गस्तीवर असून जड वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे समजते. आंतरराज्यीय मार्गावर येथूनच वाहनांची मोठ्या संख्येने वाहतूक राहते. सदर चौक ट्रान्सपोर्ट हब बनल्याची बातमी सर्वप्रथम लोकमतने पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते हे विशेष.

Establishment of Police Control Room on interstate border | आंतरराज्यीय सीमेवर पोलीस नियंत्रण कक्षाची स्थापना

आंतरराज्यीय सीमेवर पोलीस नियंत्रण कक्षाची स्थापना

Next
ठळक मुद्देखापा चौकातील तंबूत पोलीस तैनात : जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल

मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आंतरराज्यीय मार्गावरील खापा चौकात कापडी तंबुत पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. येथे फिरते पोलीस पथक सध्या गस्तीवर असून जड वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे समजते. आंतरराज्यीय मार्गावर येथूनच वाहनांची मोठ्या संख्येने वाहतूक राहते. सदर चौक ट्रान्सपोर्ट हब बनल्याची बातमी सर्वप्रथम लोकमतने पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते हे विशेष.
तुमसर पोलीस सध्या अस्थायी पोलीस चौकीत कर्तव्य बजावत असताना दिसत आहेत. तुमसर-भंडारा-गोंदिया-रामटेक हा प्रमुख राज्य महामार्ग असून मध्यप्रदेशातील बालाघाट व वारासिवनी येथे हा आंतरराज्यीय मार्ग येथूनच जातो. जड वाहतूक येथे मोठ्या प्रमाणात २४ तास सुरू आहे. खापा चौक हे तुमसर शहराचे प्रवेशद्वार आहे. रात्रीला जड वाहतूक करणारे ट्रक येथे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात उभे राहतात. त्याचा धोका लहान वाहनधारकांना होता. पोलीस नियंत्रण कक्ष येथे यापूर्वी नव्हते. त्यामुळे जड वाहतुकदारांचे फावत होते. येथे नियंत्रण कक्षाची नितांत गरज होती.
तुमसर तालुक्यात सॅग्नीजचे मोठे साठे आहेत. मॅग्नीज वाहून नेणाऱ्या ट्रकांची संख्या मोठी आहे. मध्यप्रदेशातून सध्या मोठ्या प्रमाणात रेती वाहतुकीचे ट्रक धावत आहेत. बालाघाट, सिवनी, जबलपूर येथून मॅग्नीज मिश्रीत धातूंचे ट्रक याच मार्गाने जातात.
सदर ट्रक नेमके खापा चौकात थांबा घेवूनच पुढे जातात. पोलीस नियंत्रण कक्ष नसल्याने त्यांची चौकशी करणारे कुणीच नव्हते. राज्यमार्ग क्रमांक २४९ व २७१ येथून जातात. येथे रात्री जड वाहतूक ट्रकांची थांबा सध्या कमी झाला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाचा हा परिणाम मानला जात आहे. भंडारा येथून फिरते पोलीस पथके खापा चौकात दररोज गस्त घालीत आहे. यामुळे जड वाहतुकीवर मोठा परिणाम जाणवत आहे. भंडारा पोलीस अधिक्षक विनिता साहू यांनी मोठा निर्णय घेऊन पोलीस चौकी स्थापन केली. अस्थायी पोलीस चौकीची स्थायी चौकीत रूपांतर करण्याची गरज आहे.
भंडारा रस्त्यावर कापडी तंबू उभारण्यात आले आहे. थंडीच्या दिवसात येथे कर्तव्य बजाविणाºया पोलीस कर्मचाºयांना साहजीकच त्रास जाणवणार आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी येथे नियमित पोलीस चौकी कायमस्वरूपी बांधकामाला हिरवी झेंडी देण्याची गरज आहे. मनसर-गोंदिया रस्ता राष्ट्रीय महामार्गाची घोषणा होवूनकामे सुरू झाली आहेत. त्यामुळे या रस्त्याचे महत्व वाढले आहे.

Web Title: Establishment of Police Control Room on interstate border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.