चौंडेश्वरी मंदिरात १,४८१ ज्योतिकलशांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:25 AM2017-09-23T00:25:40+5:302017-09-23T00:26:18+5:30

येथील माता चौंडेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. उत्सवादरम्यान मंदिर परिसरात दुकाने सजली आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे.

Establishment of 1,481 gyothicals in Chundeshwari temple | चौंडेश्वरी मंदिरात १,४८१ ज्योतिकलशांची स्थापना

चौंडेश्वरी मंदिरात १,४८१ ज्योतिकलशांची स्थापना

Next
ठळक मुद्देनवरात्रोत्सवाला प्रारंभ : दर्शनासाठी भाविकांची रीघ, दुकाने सजली

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : येथील माता चौंडेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. उत्सवादरम्यान मंदिर परिसरात दुकाने सजली आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे. यावर्षी चौंडेश्वरी मंदिरात १,४८१ ज्योतिकलशाची स्थापना करण्यात आली आहे.
टेकडी या नावाने ओळखल्या जाणाºया मांडेसर-कान्हळगाव मार्गावर चौंडेश्वरी मातेचे मंदिर आहे. मंदिराला सहाशे वर्षाचा इतिहास आहे. जागृत देवी असल्याने या मंदिरात भाविक वर्षभर मातेचे दर्शन घ्यायला येतात. मागील दहा वर्षाच्या तुलनेत चौंडेश्वरी मंदिर सुविधांनी सज्ज व आकर्षक झाले आहे. देवस्थान समितीने धर्मशाळा, सभागृह, दुकानांची व्यवस्था, गोदाम बांधकाम, बगीचा, प्रसाधनगृह ही कामे केली आहेत. चौडेश्वरी मंदिर कमेटीच्यावतीने गावकºयांना शुद्ध पाणी मिळण्याची सुविधा केली जाणार आहे. लोकोपयोगी व मंदिरातील कामांना प्राथमिकता दिली जात आहे.
नवरात्रीमध्ये मोहाडी चौंडेश्वरी मंदिरात यात्रा भरत असते. येथे दर्शनासाठी विदर्भासह मध्यप्रदेशातील भाविकांची गर्दी असते. सकाळच्या आरतीला मंदिरात खूप गर्दी असते. नवरात्रोत्सवासाठी विविध कमिटी स्थापन करण्यात आल्या आहेत. नऊ दिवस पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दसºयाच्या दिवशी मोहाडीत त्रिसंगम सोहळा साजरा केला जातो. रावणदहन, विद्यार्थी दुर्गा उत्सव मंडळाचा महाप्रसाद व मंदिरातील नवव्या दिवशीचे दर्शन करण्यासाठी हजारो लोक मोहाडी येथे सकाळपासून येतात. चौंडेश्वरी माता मंदिराच्या परिसरात नयनरम्य रावणदहनाचा कार्यक्रम होत असतो.
जिल्हाधिकाºयांच्या हस्ते कलशपूजा
चौंडेश्वरी मंदिरात १,४८१ ज्योतिकलशाचे दीप प्रज्वलन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ते मंदिरात आले होते. यावेळी ज्योती कलशाचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनीही ज्योती कलशाची पूजा केली. यावेळी मोहाडी नगरपंचायतच्या सीईओ स्नेहा करपे, नगराध्यक्ष स्वाती निमजे, ठाणेदार जगदीश गायकवाड, चौंडेश्वरी माता उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पात्रे, कमेटीचे अध्यक्ष प्रेमरतन दम्माणी, एकानंद समरीत, शाम डेकाटे, रमेश गोन्नाडे, जयपाल गायधने, बाळू बारई, किशोर पात्रे, शिवशंकर गभणे उपस्थित होते.

Web Title: Establishment of 1,481 gyothicals in Chundeshwari temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.