भूकंपाचे धक्के अन् भेदरलेले ग्रामस्थ

By admin | Published: July 25, 2015 01:15 AM2015-07-25T01:15:36+5:302015-07-25T01:15:36+5:30

गुरुवारला रात्री आठ वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घराबाहेर पडले.

Earthquake shock and villagers are grateful | भूकंपाचे धक्के अन् भेदरलेले ग्रामस्थ

भूकंपाचे धक्के अन् भेदरलेले ग्रामस्थ

Next

प्रशासन म्हणते कुठलीही हानी नाही : साकोली, तुमसर, लाखांदूर, लाखनी, करडीत भिंतींना तडे

भंडारा : गुरुवारला रात्री आठ वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घराबाहेर पडले. रात्री घरात जाण्यासाठी त्यांची हिंमत होत नव्हती. रात्री पुन्हा धक्के जाणवणार असल्याची अफवा पसरविण्यात आल्यामुळे बहुतांश गावात नागरिकांनी रात्र जागून काढली. आज सकाळपर्यंत अनेकांचे चेहरे घाबरलेले दिसून आले होते.
साकोलीत भीतीचे वातावरण
साकोली तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, भुकपांच्या धक्क्याने अनेक घरांना भेगा पडल्या, काही घरांच्या भिंती कोसळल्या तर सेंदुरवाफा येथे पाच ते सहा फुटाचा खड्डा पडला. कालपासून नागरीक दहशतीत आहेत. काहींनी तर रात्रीच भितीपोटी बाहेरगावी नातेवाईकांकडे धाव घेतली.
रात्री आठच्या सुमारास गळागळा आवाजासह जमिनीसह घरे हलली. त्यानंतर भूकंप आला भूकंप आला, बाहेर निघा, असे म्हणत नागरिक घराबाहेर पडले. जिकडे तिकडे घाबरलेले चेहरे दिसत होते. तब्बल दोन तासानंतर लोकांनी घाबरत घाबरत घरात प्रवेश केला. मात्र हाच भूकंपाचा धक्का रात्री पुन्हा बारा ते एकच्या दरम्यान येऊ शकतो, अशी अफवा पसरल्यामुळे नागरीक पुन्हा भयभीत झाले. बरेच लोक रात्री झोपले नाहीत. आताही नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण आहे. आज सकाळीही चौकाचौकात भूकंपाच्या धक्क्याचीच चर्चा होती.
वडद येथे भिंती पडल्या
वडद येथील जानु चोपकर, सोनबा मसराम व हरी शहारे यांच्या घराच्या भिंती कोसळल्या. लोकराम कापगते महाराज यांच्या घराच्या विहिरीची तोंडी पडून विहिरीच्या लागून पाच फुटाचा खड्डा पडला. परसोडी गावातही भितींना भेगा पडल्या आहेत.
तलाठी निवडणुकीत व्यस्त
भूकंपाच्या धक्यामुळे घरांच्या भिंती पडून नुकसान झाले. २५ जुलैला ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने तलाठ्यांना नुकसानीची पाहणी करता आली नाही. यासंदर्भात तहसिल कार्यालयाशी नुकसानीची माहिती विचारली असता आतापर्यंत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. (लोकमत चमू)

Web Title: Earthquake shock and villagers are grateful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.