मांडवीत चार हजार ब्रास रेतीचा डम्पींग यार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:51 PM2019-03-18T22:51:28+5:302019-03-18T22:51:48+5:30

वैनगंगा नदीचे काठावर असणाऱ्या मांडवी गावाचे हद्दीत ४ हजार ब्रास रेतीचा अनधिकृत डम्पींग यार्ड तयार करण्यात आले. नद्यांचे काठावरील अनेक उम्पींग यार्डचा हा बाप असल्याचा अनुभव येत आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने रविवार आणि शनिवार असे दोन दिवस सिहोरा परिसरात शोध मोहिम राबविली असता अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Dumping yard of four thousand brass sand bears a mandatory | मांडवीत चार हजार ब्रास रेतीचा डम्पींग यार्ड

मांडवीत चार हजार ब्रास रेतीचा डम्पींग यार्ड

Next
ठळक मुद्देरेती माफियांची शक्कल : रात्री उशिरापर्यंत ट्रकमधून होतेय वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदीचे काठावर असणाऱ्या मांडवी गावाचे हद्दीत ४ हजार ब्रास रेतीचा अनधिकृत डम्पींग यार्ड तयार करण्यात आले. नद्यांचे काठावरील अनेक उम्पींग यार्डचा हा बाप असल्याचा अनुभव येत आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने रविवार आणि शनिवार असे दोन दिवस सिहोरा परिसरात शोध मोहिम राबविली असता अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी या दोन नद्यांचे विशाल पात्र आहे. या नद्यांचे पात्रात असणाऱ्या रेतीला मोठी मागणी व पसंती विदर्भ आणि नजिकच्या मध्यप्रदेशात आहे. या परिसरात अनेक रेतीचे घाट असले तरी एकही घाटांचा लिलाव झालेला नाही. यामुळे गाव स्तरावर माफियांचा उदय झाला आहे. नदीचे पात्रापासून महसूल विभागाचे यंत्रणेच्या निदर्शनास येणार नाही या करिता काही अंतरावरील गावात रेतीची साठवणूक करण्यात येत आहे. यामुळे रेतीचे वाहतूक करणारी ट्रक दिवसभर राज्य मार्गावर दिसत नाही.
सायंकाळी ते रात्री उशिरापर्यंत अनेक ट्रक रेतीची वाहतूक करताना दिसून येत आहेत. सोंड्या, वारपिंडकेपार, महालगाव, ब्राम्हणटोला, बपेरा, देवरी देव, चुल्हाड, सिंदपुरी, मोहाडी खापा, परसवाडी, रेंगेपार, तामसवाडी, मांडवी आणि सितेपार गावाचे हद्दीत रेतीचे साठवणूक असणारे अनधिकृत डम्पींग यार्ड तयार करण्यात आली आहे. या गवाात असणारे डम्पींग यार्डाचे ठिकाण वारंवार बदल करण्यात आल्याचे दिसून आले आहे. परसवाडा गावातील नाल्यालगत रेतीची साठवणूक करण्यात आली आहे. मांडवी गावात नदीचे विशाल पात्र आहे. या गावातील नदी पात्राचे शेजारी खाजगी जागेत ४ हजार ब्रास रेतीचे साठवणूक असणारा एकच डम्पींग तयार करण्यात आलेला आहे. डम्पींग यार्ड अनधिकृत असला तरी खाजगी जागेत आहे. हजारो ब्रास रेती असल्याने लिलाव पद्धतीत कारवाईची प्रतिक्षा रेती माफियांना आहे. वाढते रेतीचे डम्पींग यार्ड उभारले जात असताना निश्चितच महसूल विभागाचे वरिष्ठ यंत्रणेला तारेवर घेतले जात आहे.
परंतु यंत्रणेचा दुवा आणि कणा असणारा तलाठीच आंधळ्याची भूमिका घेत आहे. या शिवाय त्याचाही सहभाग असल्याची गावात आरोप होत आहे.
४ हजार ब्रास रेतीची साठवणूक करण्यात आली असताना महसूल विभागाचे नजरेतून सुटले असल्याचे दिसून आले आहे. परंतु माफियांचे कथणी आणि करणीचा हाकनाक फटका काहींंना बसत आहे.
‘लोकमत’ प्रतिनिधीने नदीचे काठावर फेरफटका व शोध मोहीम राबविली असता धक्कादायक प्रकार दिसून आले. नदीचे काठालगत असे डम्पींग यार्ड तयार करण्यात आले आहे, अर्ध शतक डम्पींग यार्ड असताना माफियाचे विरोधात कारवाई केली जात नाही. परंतु घरकुलधारक लाभार्थ्यांना रडारवर घेतले जात आहे. नद्याचे काठावर रेती माफियांचे साम्राज्य निर्माण झाला आहे. रेतीच्या चोरीने गावकरी गस्त झाले आहे. रात्रभर गावातून वाहने धावत असल्याने गावकऱ्यांची झोप होत नाही.

तासमवाडी घाटावरून रेतीची चोरी बंद करण्यासाठी तक्रार दिली असता पोलीस चौकी देणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु स्थिती जैसे थे आहे.
-अनिल वासनिक,
ग्रामपंचायत सदस्य, तामसवाडी.

Web Title: Dumping yard of four thousand brass sand bears a mandatory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.