ईव्हीएम नको, बॅलेट पेपरच हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:38 PM2019-06-17T23:38:50+5:302019-06-17T23:39:05+5:30

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करीत भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यात सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली. या आशयाचे निवेदन भारत निर्वाचन आयोगाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले.

Do not EVM, ballot paper | ईव्हीएम नको, बॅलेट पेपरच हवा

ईव्हीएम नको, बॅलेट पेपरच हवा

Next
ठळक मुद्देघंटानाद आंदोलन : भारिप-बहुजन महासंघाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करीत भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यात सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली. या आशयाचे निवेदन भारत निर्वाचन आयोगाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले.
भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सभेत मार्गदर्शन केले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा क्षेत्रात झालेल्या मतदानात एकुण मतदार व निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दिलेल्या ईव्हीएमच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. तसेच या मतांच्या अंतराबाबत १५ दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. लोकशाही प्रणालीला अधिक बळकट करण्यासाठी आता ईव्हीएम पेक्षा बॅलेट पेपरवरच निवडणूक घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना देण्यात आले.
यावेळी महासचिव दीपक गजभिये, गौतम कांबळे, नरेंद्र बन्सोड, शैलेश राऊत, तुलशीराम गेडाम, एस.एस. बोरकर, लक्ष्मण तिरपुडे, भीमराव बन्सोड, कुंदलता उके, रमा रामटेके, रेखा टेंभुर्णे, अजय तांबे, प्रा.के.एन. नान्हे, महेंद्र मेश्राम, सुरेश खंगार, उके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Do not EVM, ballot paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.