सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 10:23 PM2018-06-17T22:23:11+5:302018-06-17T22:23:24+5:30

मागील साडे तिन वर्षांपासून देशात सत्ताधारी भाजपाने शेतकरी, शेतमजुरांची पिळवणुक करण्याच काम केले असून, या सरकारची पेशवेशाही संपविण्यासाठी एकत्र येऊन आपण मला अपेक्षीत मताधिक्याने निवडून देऊन आपली वकीली करण्याकरीता दिल्लीला पाठविले आहे.

Do justice to the common people | सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करणार

सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करणार

googlenewsNext
ठळक मुद्देकुकडे यांचे प्रतिपादन : लाखांदूर येथे सत्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदुर : मागील साडे तिन वर्षांपासून देशात सत्ताधारी भाजपाने शेतकरी, शेतमजुरांची पिळवणुक करण्याच काम केले असून, या सरकारची पेशवेशाही संपविण्यासाठी एकत्र येऊन आपण मला अपेक्षीत मताधिक्याने निवडून देऊन आपली वकीली करण्याकरीता दिल्लीला पाठविले आहे. माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला न्याय देऊन चार वर्षांत जे होऊ शकले नाही, ते नऊ महिन्यात करून दाखऊ असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी केले. ते लाखांदुर येथे शनिवारी आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
भारतीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखांदुरच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार सेवक वाघाये, जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे, राँका जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, जि.प.सदस्य मनोहर राऊत, जि.प. सदस्या प्रणाली ठाकरे, शुद्धमता नंदागवळी, बा.स. सभापती सुभाष राऊत, उपसभापती देविदास राऊत, न.पं. गटनेता रामचंद्र राऊत, नगरसेवक देवानंद नागदेवे, निकेश दिवठे, पं.स.सदस्या तृप्ती मातेरे, पं.स.सदस्य वासुदेव तोंडरे, गुलाब कापसे, कृ.उ.बा.स. संचालक गोपीचंद राऊत, नरेश दिवठे, निमा ठाकरे, सचिव श्रीकांत दोनाडकर यांच्यासह आधी मान्यवर उपस्थित होते.
खा.कुकडे म्हणाले की, भ्रष्टाचार मुक्त भारत सांगणाऱ्या भाजपा सरकारच काळात माल्या, निरव मोदी यांच्या सारख्या अनेकांनी देश लुटून विदेशात गेले आहेत. या सरकारमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. ही लोकशाही वाचवायची असेल तर संविधान वाचवावे लागेल. जम्मू काश्मीर मधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची खळबळ जनक घटना घडली असतांना सुद्धा सरकारने कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलली नाही. गेल्या चार वर्षात महिलांच्या बाबतीत आरोपीला वाचविण्याचे कारस्थान या सरकारने केले. त्यामुळे जनतेने यांना या निवडणुकीत धडा शिकवला. भंडारा गोंदिया निवडणुकीत झालेला विजय हा माझा विजय नसून हा लोकशाही व जनतेचा विजय आहे.
कुकडे यांच्यासह राष्ट्रवादी कांग्रेस भंडारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पंचबुद्धे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शिलमंजू सिव्हगडे यांनी केलो तर आभार तालुकाध्यक्ष बालू चून्न यांनी मानले. कार्यक्रमासाठी कांग्रेसचे तालुकाध्यक्ष भुमेश्वर महावडे, ताराचंद मातेरे, उत्तम भागडकर, मुनेश्वर दिवठे, होमराज ठाकरे, पप्पू मातेरे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Do justice to the common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.