रेशीम उद्योगातील कामगारांच्या मागण्यांसाठी धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:41 PM2019-02-18T22:41:47+5:302019-02-18T22:42:05+5:30

रेशम उद्योगातील उत्पादन प्रक्रिेयत वर्षानुवर्षापासून काही नियमित तर काही अंगावरचे ठेका पद्धतीने काम करणाऱ्या तांत्रिक कुशल व अकुशल स्वरूपाचे काम करणाऱ्या महिला पुरूष कामगारांच्या न्याय मागण्यांच्या पुर्ततेसाठी आयटकचे जिल्हा सचिव हिवराज उके यांच्या नेतृत्वात कलेक्टर कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांना सात मागण्यांचे निवेदन सोमवारला शिष्टमंडळद्वारे देण्यात आले.

For the demands of the workers in the silk industry, take responsibility | रेशीम उद्योगातील कामगारांच्या मागण्यांसाठी धरणे

रेशीम उद्योगातील कामगारांच्या मागण्यांसाठी धरणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रेशम उद्योगातील उत्पादन प्रक्रिेयत वर्षानुवर्षापासून काही नियमित तर काही अंगावरचे ठेका पद्धतीने काम करणाऱ्या तांत्रिक कुशल व अकुशल स्वरूपाचे काम करणाऱ्या महिला पुरूष कामगारांच्या न्याय मागण्यांच्या पुर्ततेसाठी आयटकचे जिल्हा सचिव हिवराज उके यांच्या नेतृत्वात कलेक्टर कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांना सात मागण्यांचे निवेदन सोमवारला शिष्टमंडळद्वारे देण्यात आले.
त्यात रेशीम कामगारांना नियमित कुशल व तांत्रिक कामगारांचा हेड लागू करून १८ हजार रूपये किमान वेतन लागू करा, नियमित काम करणाºया कामगारांना अनुभवाच्या आधारावर चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या, नियमित व ठेका कामगारांना किमान वेतन देवून सामाजिक सुरक्षे अंतर्गत पीएफ विमा व इतर सेवाशर्ती लागू करा, ठेका कामगारांना नियमित १२ महिने काम रोलिंग मशिनवर व सुत काढणाºया महिलांना काम, किमान वेतन व कमीत कमी ५०० रूपये रोजमजुरी द्या, सर्व कामगारांना सेवेत साप्ताहिक व शासन स्तरावरच्या सर्व सुट्या लागू करा, ६० वर्षावरील सर्व कामगारांना ५००० रूपये पेंशन लागू करा आदी मागण्यांचा समावेश होता.
शिष्टमंडळात हिवराज उके, राजकुमार बागडे, विजय डहारे, मळावी, मनोरमा गणवीर आदींचा समावेश होता. याप्रसंगी जिल्हाधिकाºयांनी योग्य कार्यवाही करून तसे सुचित करण्यात येईल, असे सांगितले.
धरणे आंदोलनात सर्व प्रथम जम्मू काश्मीर येथील पुलवामाच्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गजानन पाचे, राजू लांजेवार, राजू कासवकर, प्रियंका नागपुरे, शहारे, माधुरी मस्के, प्रकाश चिनकुरे, रामकृष्ण निमजे, अर्चना मेश्राम, स्वर्णलता रामटेके आदी उपस्थित होते.

Web Title: For the demands of the workers in the silk industry, take responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.