ऑनलाईन शॉपिंगमध्ये ग्राहकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:44 PM2019-03-18T22:44:49+5:302019-03-18T22:46:11+5:30

इंटरनेटमुळे व्यवहारांमध्ये सुलभता आली असलीतरी त्याच बरोबर अनेक धोकेही होत आहेत. चोरटेही आता या क्षेत्रात कार्यरत झाल्याची माहिती पुढे येत आहे. केवळ ज्ञान मिळवून शिक्षण घेवून घरबसल्या दरोडा टाकता येत असल्याने चोरीची पद्धतीही बदलली आहे.

Customer fraud in online shopping | ऑनलाईन शॉपिंगमध्ये ग्राहकांची फसवणूक

ऑनलाईन शॉपिंगमध्ये ग्राहकांची फसवणूक

Next
ठळक मुद्देकाळानुरूप बदलली पद्धती : आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचीही दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : इंटरनेटमुळे व्यवहारांमध्ये सुलभता आली असलीतरी त्याच बरोबर अनेक धोकेही होत आहेत. चोरटेही आता या क्षेत्रात कार्यरत झाल्याची माहिती पुढे येत आहे. केवळ ज्ञान मिळवून शिक्षण घेवून घरबसल्या दरोडा टाकता येत असल्याने चोरीची पद्धतीही बदलली आहे.
शारीरिक कष्ट घेण्यापेक्षा चोरट्यांना आता केवळ वेबसाईट हॅक करण्याचे ज्ञान मिळविणे इतकीच तसदी घ्यावी लागत असल्याने या क्षेत्रातही चोरट्यांची संख्या वाढली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातूनच ऑनलाईन खरेदी दरम्यान अनेक फसवणुकीच्या घटना उजेडात येताना दिसतात. ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काही गोष्टींची खरबदारी घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन म्हणजेच इंटरनेट शॉपिंग करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो. घर बसल्या खरेदी असल्यामुळे बाजारातील गर्दी, वेळ आणि इंधनाची बचत होते. परंतु ऑनलाईन शॉपिंग बद्दल लोकांच्या मनात शंकाकुशंका वाढत आहे. अनेकांची यामुळे झालेली फसवणूक आणि आॅनलाईनची विश्वासार्हता यामुळे ग्राहकही अडचणीत येत आहेत.
स्वस्तातले स्मार्टफोन व इंटरनेटमुळे सध्या खेड्यातील व्यक्तीही ब्राऊजिंग करुन एकाच प्रकारातील शेकडो प्रॉडक्ट्स ऑनलाईन बघू शकतात. त्यामुळे पारंपरिक दुकानांमध्ये स्टोअर्ससह मॉलमध्ये प्रत्यक्षात जावून होणारा वेळेचा अपव्यय टळू शकतो. आॅनलाईन रिटेंलिंगमुळे खरेदीचा विस्तार झाला आहे. आॅनलाईन रिटेलिंगने खरेदीचे दालन सर्वांसाठी खुले केले आहे. त्यामुळे जे लोक रिटेलिंग पासून दूर होते ते आता जवळ आले आहेत. ऑनलाईन रिटेलर्स ग्राहकांना काहीशा वाजवी दरात विविध वस्तुंची विक्री करतात जे प्रॉडक्ट गावात मिळत नाही त्याचीही खरेदी करणे यामुळे शक्य झाले आहे.
वेबसाईट मुळे आपण केव्हाही ऑनलाईन खरेदी करु शकतो. यामुळे जे लोक जायबंदी आहेत अशा लोकांनाही बसल्या जागी वस्तूंची खरेदी करता येते तसेच खरेदी करण्यापूर्वी आपण इंटरनेटवर विविध प्रॉडक्टसबाबत संशोधन तसेच त्यांच्या किंमतीतील तुलना करु शकतो. जे विविध दुकानांना, स्टोअर्सला प्रत्यक्ष भेट देवून करुन घेणे अवघड असते. आॅनलाईन खरेदीचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. ऑनलाईन रिटेलर्स जरी पारंपरिक दुकानाच्या तुलनेत वाजवी दरात प्रॉडक्टसची दुकानांच्या तुलनेत विक्री करीत असले तरीही त्या प्रॉडक्टसच्या दजार्बाबत कुणीही शाश्वती देवू शकत नाही. पारंपरिक दुकानांमध्ये जावून वस्तूची तत्काळ खरेदी केली तर तीवस्तू घरी यायला काही दिवस लागतात. ऑनलाईन वस्तू परत करणे अवघड असते. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वाहतुकीचा खर्च द्यावा लागतो.

Web Title: Customer fraud in online shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.