गोवर-रुबेला लसीकरणासाठी सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:02 PM2018-09-19T22:02:46+5:302018-09-19T22:03:03+5:30

गोवर हा प्राणघातक रोग आहे आणि बालकांमधील अपंगत्व तसेच मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. रुबेला हा गर्भवती महिला व नवजात बालकांसाठी जीवघेणा आजार आहे. महाराष्ट्राला गोवर रुबेला मुक्त करण्यासाठी शासन लसीकरण मोहीम राबविणार असून ही मोहिम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.

Cooperate with Gore-Rubella vaccination | गोवर-रुबेला लसीकरणासाठी सहकार्य करा

गोवर-रुबेला लसीकरणासाठी सहकार्य करा

Next
ठळक मुद्देशांतनू गोयल : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, जिल्हाभर राबविणार मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोवर हा प्राणघातक रोग आहे आणि बालकांमधील अपंगत्व तसेच मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. रुबेला हा गर्भवती महिला व नवजात बालकांसाठी जीवघेणा आजार आहे. महाराष्ट्राला गोवर रुबेला मुक्त करण्यासाठी शासन लसीकरण मोहीम राबविणार असून ही मोहिम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.
गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहिम राज्यात १४ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात ही मोहिम राबविण्यात येणार असून यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
भंडारा जिल्ह्यातील अंदाजे २ लाख ८० हजार बालक- मुलांना ही लस देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने सर्व तयारी केली आहे. लसीकरणाबाबत आरोग्य यंत्रणेला प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मोहिमेत सामाजिक संस्थाचे सहकार्य घेण्यात येणार असून त्यांनासुद्धा प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी सांगितले.
या मोहिमेत शिक्षण विभागाचा महत्त्वाचा सहभाग असून यासाठी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची यादी बनविण्यात आली आहे. पालकांची बैठक घेऊन त्यांना लसीकरण मोहिमेची माहिती करून द्यावी असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. प्रत्येक शाळेत मोहिमेविषयी जागरूकता निर्माण करावी असेही त्यांनी सांगितले. मोहिमेच्या व्यापक जनजागृतीसाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या मोहिमेत शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, खासगी शिक्षण संस्था, ग्रामविकास व पंचायतराज विभाग, वैद्यकीय शिक्षण व नर्सिंग परिषद, अल्पसंख्याक कल्याण विभाग, समाजकल्याण विभाग, कामगार विभाग, औद्योगिक विभाग, लॉयन्स क्लब रोटरी क्लब, रेडक्रॉस सोसायटी यांच्यासह विविध विभागाचे सहकार्य लाभणार आहे. या सर्व विभागांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Cooperate with Gore-Rubella vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.