विद्युत प्रवाहाने चितळाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:54 PM2017-11-24T23:54:52+5:302017-11-24T23:55:51+5:30

साकोली वनक्षेत्र कार्यालयातंर्गत येणाऱ्या सानगडी पश्चिम सहवन परिक्षेत्रातील पापडा खुर्द शिवारात विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने चितळाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Chitter hunting by electric current | विद्युत प्रवाहाने चितळाची शिकार

विद्युत प्रवाहाने चितळाची शिकार

googlenewsNext
ठळक मुद्देसानगडी परिसरातील घटना : तीन दिवसांपासून आरोपी फरारच

आॅनलाईन लोकमत
साकोली : साकोली वनक्षेत्र कार्यालयातंर्गत येणाऱ्या सानगडी पश्चिम सहवन परिक्षेत्रातील पापडा खुर्द शिवारात विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने चितळाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पापडा खुर्द शिवारातील क्रमांक १६८ सरक्षीत वनामध्ये काही लोक चितळाचे मास कापत असल्याची गोपनीय माहिती सानगडी येथील वनअधिकाºयांना मिळाली. माहिती मिळताच सानगडीचे क्षेत्र सहाय्यक घटनास्थळी पोहचले. शिकाºयांना याची माहिती मिळताच ते पसार झाले. मात्र शिकाºयांनी चितळाचे डोके व चार पाय घेऊन फरार झाले होते. वनअधिकाऱ्यांनी चितळाचे मांस जप्त करुन सानगडी वनपरिक्षेत्रात आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पवरे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मांस जाळण्यात आले. साकोली वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक पवार, वनक्षेत्राधिकारी आरती ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
सानगडी परिसरात शिकारी वाढल्या
सानगडी सहवनपरिक्षेत्राला लागूनच नवेगांव, नागझिरा व्याघ्र प्रकल्प लागून आहे. त्यामुळे सानगडी, पापडा खुर्द, झाडगांव, केसलवाडा, नैनपूर, बोळदे या परिसरात शिकाºयांनी ठाण मांडले असून विद्युत प्रवाह, शिकारी कुत्र्याच्या सहाय्याने शिकारी करुन मांसविक्री करीत आहे. या शिकारीत चितळ, हरण, मोर, रानडुकर, ससे या वन्यप्राण्याची शिकार होत आहे.

चितळ शिकारीचा तपास सुरु असून शिकाऱ्यांचा शोध घेणे सुरु आहे. लवकरच शिकाºयांना पकडून त्यांच्यावर कारवाई करु.
एस.टी. पवार,
सहाय्यक वनसंरक्षक

Web Title: Chitter hunting by electric current

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.