शैक्षणिक प्रगतीसाठी मुलांमध्ये शीलयुक्त आचरण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:28 PM2018-06-23T22:28:17+5:302018-06-23T22:28:44+5:30

मुलांनी शिक्षणात प्रगती साधण्यासाठी शीलयुक्त आचरण ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायाधीश विजय धांडे यांनी केले. प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान व त्रिरत्न बौद्ध महिला मंडळाच्यावतीने दोन दिवसीय बाल आनापानसती शिबिर सिद्धार्थ बुद्ध विहार आंबेडकर वॉर्ड भंडारा येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.

Children need decent behavior for academic progress | शैक्षणिक प्रगतीसाठी मुलांमध्ये शीलयुक्त आचरण आवश्यक

शैक्षणिक प्रगतीसाठी मुलांमध्ये शीलयुक्त आचरण आवश्यक

Next
ठळक मुद्देसेवानिवृत्त न्यायाधीश विजय धांडे : बाल आनापानसती शिबिर उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मुलांनी शिक्षणात प्रगती साधण्यासाठी शीलयुक्त आचरण ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायाधीश विजय धांडे यांनी केले. प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान व त्रिरत्न बौद्ध महिला मंडळाच्यावतीने दोन दिवसीय बाल आनापानसती शिबिर सिद्धार्थ बुद्ध विहार आंबेडकर वॉर्ड भंडारा येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.
प्रथम दिवशी सकाळी भंते सिद्धीरत्न व भिक्षुणी धम्मदिना यांचे उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमांना पुष्प अर्पण करून विनय धांडे यांनी शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी संजय उके, प्रतीक कांबळे, उपप्रबंधक एन.टी.पी.सी. व महिला मंडळाच्या अध्यक्षा लिला रामटेके उपस्थित होत्या.
सर्वप्रथम भंते सिद्धीरत्न व भिक्षुणी धम्मदिना यांनी शिबिरार्थ्यांना वंदना पाठ घेऊन धम्म प्रबोधन करण्यात आले. त्यांनी धम्म प्रबोधनात मुलांनी लहानपणापासून शीलाचे पालन करण्यावर लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे चांगल्या सवयी बालपणापासून जळत असतात, असे सांगितले व लहान लहान गोष्टीच्या स्वरुपात शीलाचे महत्व पटवून सांगितले.
दुसऱ्या सत्रात माजी न्यायाधीश विजय धांडे यांनी आनापान सतीचे विश्लेषण करून सांगितले. यात आन म्हणजे येणारा श्वास, अपान म्हणजे जाणारा श्वास व सती म्हणजे जागरूकता, म्हणजेच येणाºया जाणाºया श्वासाला जागृत राहून बघणे यालाच आनापान सतिचे ध्यान म्हणतात असे सांगितले. ध्यानाने मनाची एकाग्रता साधल्या जाते मनाच्या एकाग्रतेतून आपण जीवनात यशस्वी होवू शकतो असे सांगितले व मुलाचे जीवनात धम्माचे महत्व उदाहरणासह समजावून सांगितले.
दुसºया दिवशी जीवनात पंचशीलाचे किती महत्त्वाचे स्थान आहे, हे उदाहरणासह समजावून सांगितले. मुलांनी पंचशीलाचे दररोज पालन करणे गरजेचे आहे.
त्यानंतर हरिश्चंद्र दहिवले यांनी मुलांना मानापान सतिचे ध्यान शिकविले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.एम. खोब्रागडे यांनी जीवनात कलेचे महत्व सांगितले. डॉ.नितीन तुरस्कर एम.एस. यांनी मुलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, मुलांनी लहाणपणापासून बचतीची सुरुवात केल्यास पैसा संग्रहीत होऊन मोठेपणी शिक्षणात पैशाची मदत होते याबाबत माहिती दिली.
शिबिरात चित्रकला व स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यामध्ये प्रथम श्रावणी गोंडाणे, अर्पिता खोब्रागडे, राणी वाहने, अपर्णा खोब्रागडे, माही कुंभलकर, अंशुल बोरकर, द्वितीय माही रंगारी, वंशिका आंबीलढुके, मंजीरी तांबे, श्रेयस गेडाम, तृतीय मैत्री बन्सोड, हर्ष रामटेके, महंत लाडे, सांची वैद्य, क्रिष्टी सुखदेवे, उज्वल गजभिये या सर्वांना पुस्तके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश धांडे यांनी शिबिरार्थ्यांना प्रोजेक्टरवर मानवी मनाच्या प्रक्रियेबद्दल ‘स्लाईड शो’ने माहिती दिली. या शिबिरात निर्मला उके, देवीदास इलमकर, आशा बोदेले, सचिन रोडगे, मिरा खोब्रागडे, महानंदा गजभिये, घोलू रामटेके, निखीता खोब्रागडे, जी.एम. मेश्राम, सुरेश रंगारी, श्रीनाथ मेश्राम, मिनल रामटेके, प्रकाश गोंडाणे, माला घोडेस्वार, राजू रामटेके, आशाताई देशभ्रतार, चित्रा गेडाम, भूपेश रामटेके यांनी सहकार्य केले. संचालन विनोद रामटेके यांनी तर शेवट मंगलगीत व धम्मपालन गाथा व भिक्षुणीकडून आशीर्वाद गाथेने झाले. या आनापान सती शिबिरात १०० विद्यार्थ्यांनी सहलाभ घेतला.

Web Title: Children need decent behavior for academic progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.