सर्वच स्तरावर केंद्र व राज्य सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 09:39 PM2018-10-14T21:39:36+5:302018-10-14T21:40:52+5:30

केंद्र आणि राज्य शासनाचे चुकीचे धोरणामुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्था व व्यवसाय गडगडले आहेत. गावाचे चित्र भकास झाले आहे. विकास शोधून सापडत नाही. ग्रामपंचायतीच्या तिजोऱ्या रिकाम्या आहेत. युपीए शासनाचे काळातील योजना केंद्र आणि राज्यात असणाऱ्या युतीच्या शासनाने बंद केल्या आहेत. यामुळे गावात उदासीनतेचे चित्र बघायला मिळत आहे.

Center and state government failures at all levels | सर्वच स्तरावर केंद्र व राज्य सरकार अपयशी

सर्वच स्तरावर केंद्र व राज्य सरकार अपयशी

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : मोहगाव येथे ग्रामपंचायत भवनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : केंद्र आणि राज्य शासनाचे चुकीचे धोरणामुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्था व व्यवसाय गडगडले आहेत. गावाचे चित्र भकास झाले आहे. विकास शोधून सापडत नाही. ग्रामपंचायतीच्या तिजोऱ्या रिकाम्या आहेत. युपीए शासनाचे काळातील योजना केंद्र आणि राज्यात असणाऱ्या युतीच्या शासनाने बंद केल्या आहेत. यामुळे गावात उदासीनतेचे चित्र बघायला मिळत आहे. सर्वच स्तरावर केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
तुमसर बपेरा राज्य मार्गावरील मोहगाव (खदान) येथे नवनिर्मित ग्राम पंचायत भवनाचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार मधुकर कुकडे होते. नवनिर्मित ग्राम पंचायत भवनाचे उद्घाटन खासदार पटेल यांच्या करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अनील बावनकर, जिल्हा परिषदेचे सभापती धनेंद्र तुरकर, महिला व बाल कल्याण सभापती रेखा ठाकरे, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा कटरे, प्रेरणा तुरकर, विजय डेकाटे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन लांजेवार, तालुकाध्यक्ष विठ्ठलराव कहालकर, उमेश तुरकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विठ्ठलराव रहमतकर, सरपंच उमेश कटरे, बिंदू मोरे उपस्थित होते.
खा.पटेल म्हणाले, नोटबंदी आणि जीएसटीने ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेली आहेत. उज्ज्वला गॅस योजनेने महिलांना लॉलीपॉप ठरत आहे. गॅस खरेदी करणे मुश्कील झाले आहे.
साडेचार वर्षात केंद्र आणि राज्य शासनाने सामान्य जनतेचे दिवाळे काढले आहेत. युपीए आणि आघाडी शासनाच्या कार्यकाळात सिहोरा परिसरात महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण केला आहे. ग्राम पंचायत मध्ये निधी होता. परंतु अनेक योजना बंद करण्यात आल्याने निधी नाही.
रोजगार हमी योजने अंतर्गत पैसे सुद्धा शासन वेळेवर देत नाही. जनधन योजनेत गरीबांनी खाते उघडले. परंतु ही योजना कुठे गायब झाली कळत नाही. केंद्र व राज्यातील सरकारला खुर्चीवरून खाली खेचण्याची वेळ आली असल्याचेही ते खासदार पटेल म्हणाले.
याप्रसंगी खासदार मधुकर कुकडे, सभापती धनेंद्र तुरकर यांचीही समयोचित भाषणे झाली. संचालन गजानन लांजेवार यांनी तर आभार सरपंच उमेश कटरे यांनी मानले.

Web Title: Center and state government failures at all levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.