तज्ज्ञांचे मार्गदर्शन : शेतकरी, अडते, व्यापारी, मापारी, हमाल यांची उपस्थिती
तुमसर : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत कॅशलेस कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ‘आपली समिती कॅशलेस समिती’ ही संकल्पना यशस्वी राबविण्याकरिता तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेऊन कार्यशाळेचे आयोजन केले होते.
तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवस्थापक हरीचंद्र पौनीकर, सर्व्हेसर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मोदी सरकारने काळाबाजारी रोखण्यासाठी चलनातील ५०० व एक हजार रूपयांच्या नोटा बंद केल्या आहेत. त्याऐवजी आता सर्व व्यवहार कॅशलेस पध्दतीने करण्यावर भर देण्यात आला आहे.
कॅशलेस व्यवहाराकरिता पीओएस, युएसएसडी, इपीएस, युपीआय, क्रेडीट कार्ड, प्रीपेड कार्ड, डेबीट कार्ड, पॅलेट आदीबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी शेतकरी, अडते, व्यापारी, मापारी, हमाल यांना सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रोजेक्टरवर प्रात्यक्षीक करवून दाखविण्यात आले. यावेळी उपस्थित व्यक्तिंनी अडचणींबाबत मार्गदर्शकांना प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञ मार्गदर्शकांनी योग्यरित्या दिली. कार्यशाळेला बाजार समितीचे संचालक अनिल जिभकाटे, डॉ. हरेन्द्र राहांगडाले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाजार समितीचे संचालक बालकदास ठवकर, नगरसेवक पंकज बालपांडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक अशोक तलमले, चौरीवार, आशिष चौरे, हरीश मेश्राम सह बाजार समितीचे कर्मचारी तथा गणमान्य नागरीक उपस्थित होते.
प्रास्ताविक बाजार समितीचे सचिव अनिल भोयर तर सहसचिव मिनाक्षी वासनिक यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)