झाडांचा गुदमरतोय श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:52 PM2019-03-18T22:52:57+5:302019-03-18T22:53:25+5:30

वृक्ष लागवड अभियान सर्वत्र राबविण्यात येत असून विशेषत: शहरात वृक्ष लावगड व वाढीकरिता विशेष प्रयत्न केले जातात. तुमसरात सिमेंट रस्त्याच्या शेजारी पूर्वी लावलेल्या वृक्षांची वाढ होत आहे. परंतु सिमेंट रस्त्याच्या काठावर सिमेंटचे गट्टू लावताना वृक्षाच्या बुंध्यापर्यंत सिमेंट कामे केली गेलीत. यामुळे वृक्षांचा श्वास गुदमरत आहे.

The breathless breath of the trees | झाडांचा गुदमरतोय श्वास

झाडांचा गुदमरतोय श्वास

Next
ठळक मुद्देगट्टू लावले झाडांच्या बुंद्यांपर्यंत : वाढीवर विपरीत परिणाम

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : वृक्ष लागवड अभियान सर्वत्र राबविण्यात येत असून विशेषत: शहरात वृक्ष लावगड व वाढीकरिता विशेष प्रयत्न केले जातात. तुमसरात सिमेंट रस्त्याच्या शेजारी पूर्वी लावलेल्या वृक्षांची वाढ होत आहे. परंतु सिमेंट रस्त्याच्या काठावर सिमेंटचे गट्टू लावताना वृक्षाच्या बुंध्यापर्यंत सिमेंट कामे केली गेलीत. यामुळे वृक्षांचा श्वास गुदमरत आहे.
तुमसर शहरात खापा टोली श्रीरामनगर परिसरातून आंतरराज्यीय मार्ग जात असून आंतरराज्यीय रस्ता सिमेंटचा तयार करण्यात आला आहे. रस्त्याच्या अगदी कडेला गट्टू लावण्यात आले. येथे लहान पण डेरेदार व उन्हाळ्यातही हिरवीगार राहणारी झाडे यापूर्वी लावण्यात आली होती. दिवसेंदिवस ती वाढत आहेत. त्या झाडांची काळजी व निगा ठेवल्याने ती मोठी होत आहेत. शहराच्या सौंदर्यात ही झाडे निश्चितच भर घालीत आहेत. शहरातील सिमेंट काँक्रीटच्या जंगलात हिरवीगार झाडे मनाला आकर्षित करतात. शुद्ध हवा देण्याची प्रमुख जबाबदारी निश्चितच ही झाडे बतावित आहेत.
मागील एका आठवड्या भरापासून रस्त्याच्या कडेला सिमेंटचे गट्टू लावण्याचे काम सुरू आहे. मुळ बुद्धांपर्यंत केवळ काही इंच जागा सोडून नावापुरती सर्व जागा गट्टू व सिमेंटने व्यापली आहे. केवळ बुंधा तेवढा येथे सोडल्याचे दिसून येते. पाऊसाचे पाणी किंवा उन्हाळ्यात पाणी कुठे देणार असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. झाडाला श्वास येथे गुदमरल्यासारखी स्थिती झाली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या सुज्ञ नागरिकांनी याबाबत लोकमतकडे तक्रार केली. तांत्रिकदृष्ट्या झाडे यामुळे वाढणार नाहीत. स्थापत्य अभियंता तथा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे दखल घेण्याची गरज आहे.
नियमानुसार झाडे लावताना किमान किती जागा हवी याचे साधे उदाहरण सर्वांना माहित आहे. गट्टू लावणाºया गारागीरांना किमान ते माहिती नसावे, परंतु संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किमान पर्यावरण संवर्धन करणाऱ्या लहान वृक्षांबाबत दखल घेण्याची गरज आहे.

खापाटोली परिसरात पेट्रोल पंपासमोर गट्टू झाडांच्या अगदी बुंध्यापर्यंत बसविण्यात आले. झाडांची सध्या वाढीचे दिवस आहेत. झाडांची येथे यामुळे वाढ होण्यास अडथडा निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे. उन्हाळ्यात त्यांचा विपरीत परिणाम होईल.
-डॉ. विजय पारधी, तुमसर.

Web Title: The breathless breath of the trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.