BJP government did injustice to farmers! | भाजप सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला!
भाजप सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला!

ठळक मुद्देअशोक चव्हाण : साकोलीत काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

लोकमत न्युज नेटवर्क
साकोली : निवडणुका आल्या की, भाजपला राम मंदिराची आठवण होते. हिंदू संस्कृतीत गाईला देवता मानले जाते. हे सत्य आहे. मात्र त्यावर काँग्रेसने कधीच राजकारण केले नाही. चार वर्षापासून धानाला भाव नाही, कर्जमाफी नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. भाजप सरकारने शेतकºयांवर सातत्याने अन्याय केला आहे. आता सत्ता परिवर्तनाची वेळ आली आहे, असे प्रतिपादन खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केले.
जनसंघर्ष यात्रेच्या साकोली शहरात आगमनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रफुल्ल गुडघे पाटील, मनोज दुआ, राजू वाघमारे, अनंतराव घरड, आ.गोपाल अग्रवाल, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, जिया पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, डॉ.अजय तुमसरे, सीमा भुरे, सभापती रेखा वासनिक, ताराबाई तरजुले, सविता ब्राम्हणकर, पं.स. सदस्य छाया पटले, तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत, शहर अध्यक्ष अश्विन नशिने, रेखाताई समरीत, मनोज बागडे, प्रमिला कुटे, माजी सभापती केवळराम लांजेवार, अंजिरा चुटे, उमेश कठाणे, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते व या संघर्ष यात्रेचे साकोलीचे आयोजक माजी आमदार सेवक वाघाये उपस्थित होते.
धानाला प्रती क्विंटल २५०० रु. हमीभाव, सरसकट कर्जमाफी यासह अन्य मागण्यांना घेऊन कॉंग्रेसने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. ही यात्रा होमगार्ड परेड ग्राऊंड साकोली येथे सायंकाळी पोहचली. या यात्रेला हजारोंच्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते. अशोकराव चव्हाण म्हणाले, दोन वर्षात जर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो तर राममंदिर का नाही? असा प्रश्न जनतेनीच आता सरकारला विचारला पाहिजे, महाराष्ट्राच्या सत्तेत असलेले भाजप सेना जरी एकमेकावर टीका करीत असले तरी दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असेही चव्हाण म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला उमेश कठाणे, दिलीप मासूरकर, विजू दुबे, विनायक देशमुख, ओम गायकवाड, विष्णू रणदिवे, उमेश भुरे, मनोहर डोंगरे, हेमंत भारद्वाज, दीपक रामटेके व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन शहर अध्यक्ष अश्विन नशिने यांनी तर आभार तालुका अध्यक्ष नंदू समरीत यांनी केले.
वाघायेंची उमेदवारी पक्की
यात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण म्हणाले, ‘सेवकभाऊ’चिंता करू नका. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तुमची उमेदवारी निश्चित असून तुम्ही बिनधास्त कामाला लागा. असे सांगून सभेतच वाघाये यांची उमेदवारी निश्चित केली. त्यामुळे राजकीय वर्तूळात व काँग्रेसच्या गोटात चर्चा सुुरु झाली आहे.


Web Title: BJP government did injustice to farmers!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.