कापड दुकानात चाकूच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न; व्यापाऱ्यांनी चोपले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 01:29 PM2019-02-17T13:29:01+5:302019-02-17T13:30:27+5:30

व्यापाऱ्यांनी पकडून दरोडेखोरांना बेदम चोप दिला असून एका तरुणास पोलिसांच्या हवाली केले आहे.

Attempt to rob a knife in a cloth shop | कापड दुकानात चाकूच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न; व्यापाऱ्यांनी चोपले

कापड दुकानात चाकूच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न; व्यापाऱ्यांनी चोपले

Next

भंडारा : तुमसर येथील कापड दुकानात शिरून चाकूच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तुमसर येथे रविवारी सकाळी ११.३० वाजताची घटना घडली.

व्यापाऱ्यांनी पकडून दरोडेखोरांना बेदम चोप दिला असून एका तरुणास पोलिसांच्या हवाली केले आहे. तर त्याचा साथीदार पसार झाला आहे. 
विकास उर्फ दुबली दलीराम गिल्लोरकर (34) रा. कुंभारेनगर, तुमसर असे आरोपीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. 

Web Title: Attempt to rob a knife in a cloth shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.