शेतकरी उन्नतीसाठी पशुपालन महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 09:16 PM2018-12-16T21:16:14+5:302018-12-16T21:16:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क करडी (पालोरा) : शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन महत्त्वाचे आहे. अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना दुधाचे चुकारे मिळालेले नाहीत. ...

Animal Husbandry Important for Farmer's Advancement | शेतकरी उन्नतीसाठी पशुपालन महत्त्वाचे

शेतकरी उन्नतीसाठी पशुपालन महत्त्वाचे

googlenewsNext
ठळक मुद्देचरण वाघमारे : पालोरा येथे पंचायत समितीच्यावतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन महत्त्वाचे आहे. अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना दुधाचे चुकारे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती नाजूक झाली आहे. दूध संघाने शेतकऱ्यांचे चुकारे वाटप न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा आमदार चरण वाघमारे यांनी केले.
पालोरा येथे पंचायत समिती, जिल्हा परिषद व राज्य पशुसंवर्धन विभागाचे वतीने आयोजित पशुपक्षी प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मोहाडी पंचायत समितीच्या सभापती विशाखा बांडेबुचे होत्या. यावेळी बेटाळा क्षेत्राच्या जि.प. सदस्या सरिता चौरागडे, जि.प. सदस्य के.के. पंचबुद्धे, निलीमा इलमे, सरपंच महादेव बुरडे, उपसरपंच साकेश चिचगावकर, पंचायत समिती सदस्य महादेव पचघरे, माजी उपसभापती विलास गोबाडे, सरपंच दिगांबर कुकडे, खंडविकास अधिकारी रवींद्र वंजारी, पंचायत समिती सदस्य हरिश्चंद्र बंधाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सतीश राजू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.पी. सपाटे, जांभोराचे सरपंच भूपेंद्र पवनकर, ग्रामपंचायत सदस्य भोजराम तिजारे, सदस्या मनीषा बुरडे, रसिका धांडे, सुषमा मेश्राम, शिल्पा आराम, रोशन कडव, मंगेश डोमळे, करडीचे सरपंच महेंद्र शेंडे, उसर्राचे सरपंच महेश पटले, तंमुस अध्यक्ष मनोहर रोटके, माजी उपसरपंच गणेश कुकडे, कवळू मुंगमोडे, मुख्याध्यापक श्रीराम काळे, जिल्हा पशुधन अधिकारी डॉ.नितीन फुके तसेच तालुका कृषी अधिकारी विजय रामटेके, पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार, तालुका पशुसंवर्धन अधिकारी चिखलीकर, तसेच तालुक्यातील सर्व दवाखान्यांचे डॉक्टर व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकरी मेळावा व प्रदर्शनीला सकाळपासूनच तालुक्यातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात पशुपक्ष्यांचे प्रदर्शन केले. सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुला-मुलींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत करीत उपस्थित मान्यवरांची वाहवा मिळविली.
प्रदर्शनीमध्ये देशी-विदेशी संकरीत गायी, म्हशी, बैल, बोकड, कोंबड्या, शेळ्या मेंढ्या, जनावरांसाठी लागणारा चारा व औषधांचे स्टॉल विविध विभागाचे वतीने लावण्यात आले. यात तालुका कृषी विभाग मोहाडी, पशुसंवधन विभाग मोहाडी, पशुसंवर्धन विभाग राज्य व जिल्हा परिषद विभागाचे वतीने शेतकºयांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. दुपारपर्यंत प्रदर्शनीत हजेरी लावलेल्या पशुंची नोंदणी करण्यात आली. उद्घाटनानंतर मान्यवरांनी जनावरांची व स्टॉलची पाहणी केली.
पशुपक्षी प्रदर्शनात आणणाºया शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षिस व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. मंचकावर शेतकऱ्यांना बोलावून शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची व आधुनिक औजारांची तसेच औषधी व कीटकनाशकांची तसेच संशोधित बियाणे व जनावरांच्या चाºयांची, विविध जनावरांचे आजार व अन्य माहिती जाणून घेतली. अधिक उत्पादन देणाऱ्या पशुपक्ष्यांची माहिती घेतली.
मेळाव्यात शेतकऱ्यांचा गौरव हा त्यांचा कष्टाचा व घेतलेल्या मेहनतीचा गौरव असल्याचे प्रतिपादन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सतिश राजू यांनी केले. यावळी उपस्थित मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन पशुधन विकास अधिकारी डॉ.सपाटे यांनी केले तर आभार करडी पशुधन विकास अधिकारी डॉ.सोनवाने यांनी मानले. यावेळी आमदार चरण वाघमारे व अन्य मान्यवरांचे हस्ते सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या मुला-मुलींना बक्षिस देण्यात आले. मेळाव्याला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालय पालोरा व शेतकरी बांधवांनी सहकार्य केले.

Web Title: Animal Husbandry Important for Farmer's Advancement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.