खराडीच्या शेतात पोहचला कृषी विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 11:32 PM2017-08-19T23:32:14+5:302017-08-19T23:34:55+5:30

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी कार्यक्रमांंतर्गत भंडारा तालुक्यातील खराडी येथे कृषी सहायक, सरपंचांनी थेट शेतकºयांच्या शेतात जाऊन धान पिकाचे प्रात्यक्षिक केले.

Agricultural Department reached Khardi Field | खराडीच्या शेतात पोहचला कृषी विभाग

खराडीच्या शेतात पोहचला कृषी विभाग

Next
ठळक मुद्देसरपंचांनी थेट शेतकºयांच्या शेतात जाऊन धान पिकाचे प्रात्यक्षिक केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी कार्यक्रमांंतर्गत भंडारा तालुक्यातील खराडी येथे कृषी सहायक, सरपंचांनी थेट शेतकºयांच्या शेतात जाऊन धान पिकाचे प्रात्यक्षिक केले.
भंडारा तालुक्यात कार्यरत कृषी सहायकाच्या कार्यक्षेत्रात उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेतून शेतकरी गटाच्या मदतीने धान पिकाचे प्रात्यक्षिक पीक पद्धतीवर आधारित मौजा खराडी येथे घेण्यात आला. पावसाळ्याला सुरवात होताच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकºयांचे डोळे पाणावले असले तरी खराडी येथील शेतकºयांनी गाव तलावातील पाण्याच्या मदतीने शासनाची पीक पद्धतीवर आधारित असलेली धानाची श्री पद्धत योजना यशस्वीरित्या राबवली. तसेच गावातील ज्या शेतकºयांकडे विंधन विहिरीद्वारे सिंचन करण्याची सुविधा आहे. त्यांनी देखील धान रोवणीला सुरवात केली आहे. कृषी सहायक रेणुका दराडे यांनी श्री पद्धत लागवड प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच शासनाच्या इतरही योजना विषयी मार्गदर्शन केले. यावेळी खराडी गावचे सरपंच संजय हिवसे, रोजगारसेवक शंकर घोटरे, ग्रामपंचायत सदस्य व इतरही शेतकरी उपस्थित होते.
गावातील दोन गटातील २५ शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला. याचा लाभ शेतकºयांना मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Agricultural Department reached Khardi Field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.