आश्वासनानंतर शाळेचे कुलूप उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 10:10 PM2018-03-18T22:10:01+5:302018-03-18T22:10:01+5:30

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिन्सी येथील शिक्षकांचे कामचुकार धोरणाला कंटाळून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त समिती यांनी शाळेला कुलूप ठोकले.

After the assurance the school lock is opened | आश्वासनानंतर शाळेचे कुलूप उघडले

आश्वासनानंतर शाळेचे कुलूप उघडले

googlenewsNext
ठळक मुद्देप्राथमिक शाळा मिन्सी येथील प्रकार : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप

आॅनलाईन लोकमत
चिचाळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिन्सी येथील शिक्षकांचे कामचुकार धोरणाला कंटाळून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त समिती यांनी शाळेला कुलूप ठोकले. मात्र विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विचार करुन केंद्रप्रमुख प्रमोद अनेराव यांनी जि.प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांच्यावतीने लेखी आश्वासन देवून शाळेचे कुलूप उघडले.
पवनी ताुक्यातील अतिदुर्गम भागात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून गाव तिथे शाळा उघडण्यात आल्या आहेत. मात्र शाळेतीलच शिक्षक शाळेला दांड्या मारीत असतील तर या दुर्गम गावांचा कसा शैक्षणिक विकास होणार. याचा प्रत्यय मिन्सी येथील जि.प. प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ प्राथमिक शाळा आहे. शाळेत ६४ विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. शाळेचे शिक्षक जिल्हा स्थळावरुन ये-जा करीत असल्याने ते शाळेत कधीच वेळेवर पोहचत नाही. १६ मार्च रोज शुक्रवारला शाळा सकाळ पाळीत होती. मात्र ९ वाजुनही शिक्षकांचा थांगपत्ता नव्हता. विद्यार्थी गावात फिरतात म्हणून ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. बेजबाबदार शिक्षकांवर कारवाई करण्याचे निवेदन दिली. सदर निवेदनाची दखल घेत सीईओंनी केंद्रप्रमुख यांना आदेश देवून सदर शाळेला सोमवारला नविन शिक्षक देण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी सरपंच रुपा शेंडे, उपसरपंच मिलिंद रंगारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुष्पराज लांडगे, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष विस्तारी हजारे, अजित काटेखाये, ब्रम्हानंद शेंडे, खुशाल कुर्झेकर व पालक उपस्थित होते.

केंद्रप्रमुख यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार सोमवारला शाळेला नव्याने शिक्षक न मिळाल्याने पुन्हा शाळेला कुलूप ठोकून आंदोलन तिव्र करु.
- पुष्पराज लांडगे,
शाळा व्यवस्थापन समिती मिन्सी
सिईओ सुर्यवंशी यांचे आदेशान्वये सदर शाळेला लेखी आश्वासन देवून शाळेला सोमवार किंवा मंगळवारला शाळेत नविन शिक्षक रुजू होतील.
- प्रमोदकुमार अनेराव,
केंद्रप्रमुख

Web Title: After the assurance the school lock is opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.