९० पेट्या देशी दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:53 PM2018-03-20T22:53:10+5:302018-03-20T22:53:10+5:30

दारूची अवैध तस्करी विरोधात कारवाई करीत पवनी परिसरातील भावड येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने देश दारूच्या ९० पेट्या जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. यात चारचाकी वाहनासह अनिल अशोक कोवे रा. बाळापूर (ता. नागभिड) याला पकडण्यात आले.

90 cartridges were caught by Indian liquor | ९० पेट्या देशी दारू पकडली

९० पेट्या देशी दारू पकडली

Next
ठळक मुद्देइसमाला अटक : १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

आॅनलाईन लोकमत
भंडारा : दारूची अवैध तस्करी विरोधात कारवाई करीत पवनी परिसरातील भावड येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने देश दारूच्या ९० पेट्या जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. यात चारचाकी वाहनासह अनिल अशोक कोवे रा. बाळापूर (ता. नागभिड) याला पकडण्यात आले.
गोपनीय माहितीच्या आधारावर पवनी तालुकयातील भावळ येथे चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. ३१ - इए-०८३१ याला गस्तीदरम्यान थांबविण्याचा ईशारा दिला. मात्र वाहनचालकने वाहन थांबविता पळ काढला. वाहनाचा पाठलाग करुन वाहन थांबविले असता एकूण ९० खरडयांच्या पेटयांमध्ये देशी दारुच्या प्रत्येकी ९० मिलीच्या ९ हजार ८०० सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. यात एकूण १० लाख ४ हजार ८०० किंमतीचा मुद्येमाल जप्त करुन महाराष्ट्र दारुबंदी कायदाचे विविध कलमांतर्गत गुन्हयाची नोंद करण्यात आली.
दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्हयाची सिमा पवनी तालुक्याला लागून असल्याने सदर देशी दारुचा साठा चंद्रपूर जिल्हयात नेला जात असावा, कयास व्यक्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त उषा वर्मा व अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरिक्षक ब्रिजलाल पटले, सहाय्यक दुय्यम निरिक्षक विनोद सोनलवार, किशोर बिरणवार, राकेश राऊत व वाहनचालक राजू श्रीरंग यांनी केली.

Web Title: 90 cartridges were caught by Indian liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.