धान खरेदीच्या ६६ केंद्राना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 09:31 PM2018-10-17T21:31:23+5:302018-10-17T21:31:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : आधारभूत धान खरेदीच्या जिल्ह्यात ६६ केंद्राना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. अपवाद वगळता प्रत्यक्ष धान ...

66 central approval for procurement of paddy | धान खरेदीच्या ६६ केंद्राना मंजुरी

धान खरेदीच्या ६६ केंद्राना मंजुरी

Next
ठळक मुद्देप्रत्यक्ष खरेदीची प्रतीक्षा : साधारण धानाला प्रति क्विंटल १७५० हमी भाव

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आधारभूत धान खरेदीच्या जिल्ह्यात ६६ केंद्राना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. अपवाद वगळता प्रत्यक्ष धान खरेदीला अद्यापही प्रारंभ झाला नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी व्यापाऱ्यांकडे धान विकण्याची वेळ आली आहे. यंदा शासनाने अप्रतिच्या धानासाठी १७७० तर साधारण प्रतिच्या धानासाठी १७५० रुपये आधारभूत किंमती निश्चित केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय धान खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा आहे.
दुष्काळाशी दोन हात करीत शेतकऱ्यांच्या धान आता घरी येवू लागला आहे. सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना पैशाची निकड आहे. त्यामुळे शेतकरी धान विकण्याच्या तयारीत आहे. मात्र काही अपवाद वगळता जिल्ह्यात सरसकट धान खरेदी केद्र सुरु झाले नाही. त्यामुळे आपला धान विकावा कुठे असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकºयांपुढे पडला आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले. १ आॅक्टोबर ते ३१ मार्च २०१९ पर्यंत धान खरेदीचा कालावधी निश्चित करण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ६६ धान खरेदी केंद्राना मंजुरी दिली आहे. त्यावरुन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी विविध सहकारी संस्थाना सात दिवसाच्या आत धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र दसऱ्यापुर्वी काही अपवाद वगळता प्रत्यक्ष धान खरेदीला सुरुवात झाली नव्हती. दसऱ्यानंतर धान खरेदी वेगात सुरु होईल, अशी अपेक्षा आहे. प्रशासनाने धान खरेदीची जय्यत तयारी चालविली आहे.
यंदा शासनाने अप्रतिच्या धानासाठी १७७० रुपये तर साधारण प्रतिच्या धानासाठी १७५० रुपये दर निश्चित केले आहे. शेतकऱ्यांना या केंद्रावर धान विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. केंद्राना जोडलेल्या गावांना आपल्या तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतून टोकन घेतेवेळी माहिती उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी आपला धान प्रत्यक्ष नंबरप्रमाणे विक्रीस आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ही आहेत धान खरेदी केंद्र
वाकेश्वर, आमगाव, बेलगाव, डोंगरगाव, कांद्री, उसर्रा, करडी, ताडगाव, मोहाडी, पालोरा, मोहगाव देवी, काटेब्राम्हणी, चुल्हाड, सिहोरा, देवसर्रा, हरदोली, वाहनी, बघेडा, आष्टी, चिंचोली, नाकाडोंगरी, बपेरा, मिटेवानी, तुमसर, माडगी, डोंगरी बुज., पिंपळगाव, पोहरा, पालांदूर, मुरमाडी तुप., लाखनी, जेवनाळा, सालेभाटा, सातलवाडा, परसोडी, एकोडी, लाखोरी, जेवनाळा, मेगापुर, देवरी, साकोली, विर्शी, सानगडी, निलज गोंदी, सुकळी, वडद, सावरबंध, पळसगाव, गोंडउमरी, लाखांदूर, बारव्हा, पुयार, मासळ, विरलीबुज. दिघोरी, पारडी, डोकेसरांडी, सरांडी बुज., हरदोली, भागडी, कऱ्हाडला, पवनी, अड्याळ (चकारा), आमगाव (पवनी), आसगाव, चिचाळ या केंद्राचा समावेश आहे.

Web Title: 66 central approval for procurement of paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.