करडी (पालोरा) : बोंड (खडकी) शेतशिवारात विद्युत कंरट लावून तीन निलघोड्याची शिकार केली. १० जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास जांभोरा बिटाचे कर्मचारी गस्तीवर असतांना दुर्गंधी आल्याने घटनास्थळी पाहणी केली असता, शिकारीचे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी धर्मा बळीराम पचघरे (४०) रा. खडकी या शेतकऱ्याने गुन्ह्याची कबुली दिली
खडकी येथील शेतकरी धर्मा बळीराम पचघरे यांचे शेत बोंडे शिवारात आहे. शेताला लागून जंगल आहे. पचघरे यांनी खरीप हंगामातील धानाचे पीक लागवडीनंतर शेतात गव्हाचे पिक लावले आहे. नाल्यावर त्यांनी पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत मोटार बसविली आहे. वन्यप्राण्यामुळे त्यांची खरिपातील धानाच्या पिकांची मोठ्या प्रमाणात हाणी झाली. त्यामुळे झालेला खर्चही निघाला नव्हता. परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस असल्याने जंगलालगतची शेती पडीत आहे.
ही घटना उघडकीस येण्याचा १५ दिवसापूर्वी एका निलघोड्याचा विद्युत करंटने मृत्यू झाला होता. शिकारीची माहिती कुणाला होऊ नये, यासाठी त्याने शेतातच खड्डा खोदून पुरला होता. पुन्हा ४ दिवसानंतर दोन निलघोड्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. (वार्ताहर)