तुमसर तालुक्यातील २० गावे सिंचनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:46 PM2019-02-18T22:46:49+5:302019-02-18T22:47:38+5:30

आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) परिसरातील २० गावे मागील एका तपापासून सिंचन सुविधेपासून वंचित आहेत. गोबरवाही परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणारी योजनाही शेवटची घटना मोजत आहे. संबंधित दोन्ही विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २५ फेब्रुवारीला तहसील कार्यालयात होत आहे. धरण परिसरात पाण्याकरिता प्रतिक्षा करावी लागत आहे. नियोजनाचा अभाव तथा तांत्रिक करणामुळेच सदर समस्या सुटली नाही.

20 villages of Tumsar taluka without irrigation | तुमसर तालुक्यातील २० गावे सिंचनाविना

तुमसर तालुक्यातील २० गावे सिंचनाविना

Next
ठळक मुद्देआदिवासीबहुल गावांचा समावेश : भंडारा, नागपूर व बालाघाट जिल्ह्यातील शेतीला होतो पाणीपुरवठा

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) परिसरातील २० गावे मागील एका तपापासून सिंचन सुविधेपासून वंचित आहेत. गोबरवाही परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणारी योजनाही शेवटची घटना मोजत आहे. संबंधित दोन्ही विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २५ फेब्रुवारीला तहसील कार्यालयात होत आहे. धरण परिसरात पाण्याकरिता प्रतिक्षा करावी लागत आहे. नियोजनाचा अभाव तथा तांत्रिक करणामुळेच सदर समस्या सुटली नाही.
तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसरातील सीतासावंगी, पवनारखानी, गणेशपूर, येदरबुची, सुंदरटोला, हेटीटोला, सोदेपूर, बाळापूर, हमेशा, धामनेवाडा, गुडरी, खंदाड, गोबरवाही, खैरटोला, आलेसूर, लेंडेझरी, लोहारा, गोंडीटोला, रोंघा, विटपूर, पिटेसूर आदी गावांना सिंचनाची सुविधा अजुनपर्यंत उपलब्ध झाली नाही. सदर गावे आदिवासी बहुल आहेत. बावनथडी आंतरराष्ट्रीय प्रकलपापासून केवळ ५ ते १५ कि़मी. अंतरावर गावे आहेत. येथील शेती सध्या निसर्गावर अवलंबून आहे. या धरणातून भंडारा तथा बालाघाट व नागपूर जिल्ह्यातील शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे हे विशेष.
धरण स्थळापासून अवघ्या काही कि.मी. अंतरावर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने आदिवासी बहुल क्षेत्रात असंतोष व्याप्त आहे. तांत्रिक अडचण येथे अधिकाºयांनी समोर केली आहे. तांत्रिक अडचण अजुनपर्यंत दूर करण्यात स्थापत्य अभियंत्यांना येथे अपयश आल्याचे दिसून येते. निधीची कमतरता ही दुसरी मुख्य समस्या आहे. याबाबत शासनस्तररावर दबक्या आवाजात चर्चा केली जाते, परंतु ठोस कारवाई कोण करणार ही मुख्य समस्या येथे आहे.
झुडपी जंगलाची समस्या येथे यापूर्वीच दूर झाली आहे. सध्या उपसा सिंचन योजना येथे २० गावांकरिता राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सदर समस्येकरीता शासनस्तरावर आता खलबते सुरू झाल्याची माहिती आहे. तहान लागल्यावर येथे विहीर खोदण्याचा प्रकार पुर्वीपासून सुरू आहे. पाणीपुरवठा योजनेला येथे घरघर लागली आहे. गोबरवाही परिसरातील मुबलक पाणीपुरवठा करणारी पेयजल योजना बावनथडी धरणावर विसंबून आहे. सदर योजनेची तांत्रिक कामे व मुबलक पाणी मिळावे याकरिताही सध्या प्रयत्न सुरू आहेत.
सिंचन व पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्याकरिता दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक २५ फेब्रुवारी रोजी होत आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच भंडारा येथे बैठकीत सदर दोन्ही समस्या मार्गी काढण्याचे निर्देश दिले हे विशेष. लोकसभा पोटनिवडणुकीत परिसरातील नागरिकांनी बहिष्काराचे अस्त्र वापरले होते. त्यामुळे सदर समस्या चर्चेत आल्या होत्या. पुन्हा लोकसभा निवडणुकीवर या समस्यांची उग्र रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२० गावातील सिंचन समस्या तथा पेयजल समस्येवर संंबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक २५ फेबु्रवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यात सविस्तर चर्चा करून तशी माहिती अधिकाºयांकडून प्राप्त करण्यात येईल.
- गजेंद्र बालपांडे,
तहसीलदार तुमसर.

Web Title: 20 villages of Tumsar taluka without irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.