चारचाकी अपघातात १० जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 09:42 PM2018-07-20T21:42:44+5:302018-07-20T21:43:04+5:30

निलज - पवनी राज्यमार्गावर दोन चारचाकी वाहनांचा आमोरासमोर धडकेत १० जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना पवनी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

10 injured in four-wheeler crash | चारचाकी अपघातात १० जखमी

चारचाकी अपघातात १० जखमी

Next

पवनी : निलज - पवनी राज्यमार्गावर दोन चारचाकी वाहनांचा आमोरासमोर धडकेत १० जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना पवनी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पवनीहून निलजकडे जाणारी चारचाकी वाहन क्रमांक ४९ एस ७२१९ व विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहन क्रमांक एमएच ४९ बी ५७७७ यांच्यात धडक झाली. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान होवून १० जण जखमी झाले. जखमींमध्ये प्रमोद गणपतराव निमजे (४५), कुसुम धनराज वाघमारे (३४), अशोक भरडे (५५), हरीष खोले (२५), संगिता कापसे (४५) सर्व रा. नागपूर तसेच विलास कुरगे, ललीत ढोमणे, लिलाधर चिखले, रूपेश धकाते, अशोक बुरडे हे जखमी झाले. ग्रामीण रुग्णालयात डॉ. आशिष मोहरकर व त्यांच्या चमूने प्रथमोचार केला.

Web Title: 10 injured in four-wheeler crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.