जालना ‘झेडपी’त २०० संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:32 AM2019-01-12T00:32:09+5:302019-01-12T00:33:12+5:30

जालना जिल्हा परिषदेत सिंचन विहिरींच्या मुद्यावरून शुक्रवारी स्थायी समितीची सभा सुरू होण्यापूर्वीच परतूर तालुक्यातील खांडवसह अन्य गावातील जवळपास २०० शेतकरी थेट सभागृहात शिरल्याने मोठा गोंधळ उडाला.

ZALA 'ZP' sticks to 200 angry farmers | जालना ‘झेडपी’त २०० संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या

जालना ‘झेडपी’त २०० संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या

Next
ठळक मुद्देसिंचन विहिरींवरून रणकंदण : सभा तहकूब, खोतकर-लोणीकर, टोपेंमध्ये खडाजंगी, शेतक-यांच्या गोंधळाने दणाणले सभागृह

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालनाजिल्हा परिषदेत सिंचन विहिरींच्या मुद्यावरून शुक्रवारी स्थायी समितीची सभा सुरू होण्यापूर्वीच परतूर तालुक्यातील खांडवसह अन्य गावातील जवळपास २०० शेतकरी थेट सभागृहात शिरल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी या शेतकºयांनी सिंचन विहिरींच्या मुद्यावरून सभागृहात जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तापले होते. त्यातच सिंचन विहिरीच्या प्रश्नावरून जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्यात खडाजंगी झाली. याचवेळी न्यायायलीन आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकाºयांची खूर्ची जप्त केल्याने या गोंधळात आणखी भर पडली. यामुळे आजची स्थायी सभा तहकूब करण्याचा निर्णय अध्यक्ष खोतकर यांनी जाहीर केला.
गेल्या वर्षभरापासून सिंचन विहिरींच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जि.प. सदस्य राहुल लोणीकर यांच्यात वाद आहे. एकट्या परतूर तालुक्यातील सिंंचन विहिरी मंजूर करताना प्रशासनाच्या म्हणण्यानुसार प्रशासकीय निकष डावलेले गेल्याने ८० शेतकºयांच्या विहीरींच्या कामाला आडकाठी आणली जात आहे. यासाठी मंत्रालय पातळीवर राहुल लोणीकर यांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या मार्फत पाठपुरावा करून जास्तीच्या सिंचन विहिरींना प्रशासकीय मंजुरी आणल्याचे सभागृहात सांगितले. मात्र जिल्हाधिकाºयांनी दोन दिवसांपूर्वी अभ्यास करून जिल्ह्यातील जवळपास ७७६ विहिरींची मान्यता रद्द केल्याचा अहवाल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष खोतकर आणि उपाध्यक्ष टोपे यांनी लोणीकर यांच्याकडे सोपविला, मात्र तो त्यांना मान्य नसल्याचे त्यांनी सांगितल्याने या गोंधळात भर पडली.
मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा या भोकरदन येथे पाणी टंचाई आढावा बैठकीसाठी गेल्या होत्या. प्रथम त्यांना बोलावा असा आग्रह सभागृहातील शेतकºयांनी लावून धरला. शेवटी अरोरा यांना ती बैठक अर्धवट सोडून जालन्यात परतावे लागले. त्यांनी आल्यावर शेतकºयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माझा विहिरी नामंजूर करण्यात कुठलाच स्वार्थ नाही. परंतु जर काही चुकीची कामे झाली असतील त्यांना रोखणे हे माझे कर्तव्य असल्याने आपण थेट प्रत्यक्ष पाहणी करून नंतर तो अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविल्याचे सांगितले. हा गोंधळ सायंकाळ पर्यंच चालल्याने कामकाज ठप्प झाले होते.
लेखी आश्वासनाने समाधान
एवढे सर्व शेतकरी येथे येण्या ऐवजी माझी वैयक्तिक भेट घेतली असती तर हा प्रश्न सुटला असता असे मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सांगून आलेल्या शेतकºयांचे समाधान केले. तसेच सिंचन विहिरी संदर्भात लेखी आश्वास दिल्यानंतर सकाळपासून आलेले शेतकरी सायंकाळी समाधानाने परतले.
संतप्त शेतकºयांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर तसेच अन्य अधिकाºयांना घेराव घातला. यावेळी अनेकांनी त्यांना सभागृहबाहेर जाऊ देण्यास नकार दिल्याने एकच गोंधळ उडाला होता.
गोंधळात केली अध्यक्षांची खूर्ची जप्त
बदनापूर तालुक्यातील धामणगाव येथे १९९९ मध्ये पाझर तलावासाठी एका धामणगावकर यांची जमीन संपादीत केली होती. परंतु त्या जमीनीचा वाढीव मावेजा जो की साडेचार लाख रूपये देण्यात आला नव्हता. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार सभागृातील इतर साहित्य तसेच खूर्ची आणि गाडी जप्त करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. संजय काळाबांडे यांनी दिली. यामुळे तरी आता संबंधित शेतकºयाला न्याय मिळेल असेही काळाबांडे म्हणाले. वाढीव मावेजा न दिल्यास पुढील कायदेशीर कारवाई लवकरच दाखल करण्यात येणार असून, सीईओ आणि जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांची गाडी जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: ZALA 'ZP' sticks to 200 angry farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.