ट्रॉलीखाली सापडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:43 AM2019-01-19T00:43:11+5:302019-01-19T00:43:38+5:30

मुलगी व जावयाला भेटण्यासाठी जात असलेल्या ऊसतोड मजूर महिलेचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्र वारी सायंकाळी ४ च्या सुमारास निपाणीजवळील गळतगा-भिमापूरवाडी मार्गावर घडली आहे.

The woman's death by trafficking under the trolley | ट्रॉलीखाली सापडून महिलेचा मृत्यू

ट्रॉलीखाली सापडून महिलेचा मृत्यू

googlenewsNext

बीड : मुलगी व जावयाला भेटण्यासाठी जात असलेल्या ऊसतोड मजूर महिलेचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्र वारी सायंकाळी ४ च्या सुमारास निपाणीजवळील गळतगा-भिमापूरवाडी मार्गावर घडली आहे. अनिता गोवर्धन मगर असे या महिलेचे नाव असून ती (मुपो हिरववाडी जि. बीड) येथील रहिवासी आहे.
मृत अनिता व त्यांचे पती गोवर्धन हे गुरुदत्त साखर कारखान्यासाठी ऊसतोड करतात. तर त्यांची मुलगी व जावई निपाणी जवळील हाल शुगरसाठी ऊसतोड करतात. शुक्र वारी सायंकाळी भेटायला जात असताना ही घटना घडली.

Web Title: The woman's death by trafficking under the trolley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.