बीड लोकसभेचा खासदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:04 AM2019-04-18T00:04:42+5:302019-04-18T00:05:59+5:30

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बीड लोकसभा मतदार संघासाठी गुरुवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Who is the MP of the Beed Lok Sabha? | बीड लोकसभेचा खासदार कोण?

बीड लोकसभेचा खासदार कोण?

googlenewsNext
ठळक मुद्देमतदारांमध्ये उत्सुकता, राजकीय पक्षही तयारीत

 बीड । लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बीड लोकसभा मतदार संघासाठी गुरुवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून ३६ उमेदवार नशीब आजमावत असून त्यात भाजपाचे डॉ.प्रीतम मुंडे, राष्टÑवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव, सपाचे स. मुज्जमील स. जमील यांच्यासह ३६ उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपा, राष्टÑवादी काँग्रेससह नोंदणीकृत पक्षाचे १० आणि २६ अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून ६ वाजता मतदान पूर्ण होईल. दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाचा पारा उतरला असून त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल, असे वाटते.
मतदानासाठी ‘सुटी’ जाहीर झाली का?
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता १८ एप्रिल रोजी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ अन्वये अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने व आस्थापना वगळून सर्व आस्थापना सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेली दुकाने, आस्थापनामधील कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकाºयांनी कळविले आहे.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
ईव्हीएम बिघडल्यास काय आहे व्यवस्था ?
ईव्हीएम मशीन बिघडण्याची शक्यता लक्षात घेता आधीपासूनच अतिरिक्त मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये ८०८ व्हीव्हीपॅट, ५९८ कंट्रोल युनिट तर १५७० बॅलेट युनिट अतिरिक्त उपलब्ध आहेत. सेक्टर आॅफिसरच्या गाडीमध्ये हे यंत्र सुरक्षित राहतील.
मतदारांसाठी ३१३३ व्हीव्हीपॅट
लोकसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच राखीवसह तीन हजार १३३ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाºयांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदांमध्ये मतदाराला पावती दिसेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.
२३३ केंद्रांतून होणार लाईव्ह कास्ट
बीड लोकसभा क्षेत्रातील एकूण मतदान केंद्रांपैकी २३३ केंद्रांतील मतदान प्रक्रिया थेट लाईव्ह बेव कास्ट करण्यात येणार आहे. या केंद्रातील हालचालींवर निवडणूक आयोग थेट लक्ष ठेवणार आहे. विशेष म्हणजे, सदर लाईव्ह कॉस्ट केवळ निवडणूक विभागच बघू शकणार आहे.
कोण आहेत उमेदवार?
प्रीतम मुंडे (भाजप), बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस), विष्णू जाधव (वंचित बहुजन आघाडी), स. मुज्जमील स.जमील (सपा), अशोक थोरात (हम भारतीय पार्टी), कल्याण गुरव (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), गणेश करांडे (महाराष्टÑ क्रांती सेना), रमेश गव्हाणे (दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल), चंद्रप्रकाश शिंदे (आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया), सादेक मुनीरोद्दीन शेख (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी)
अपक्ष : अन्वर खान मिर्झा खान, कालिदास आपेट, गणेश कोळेकर, खान मझहर हबीब, गालेब खान जब्बार खान पठाण, संपत चव्हाण, नीलेश जगताप, जमीर बशीर शेख, जुबेर मुन्शी कुरेशी, तुकाराम व्यंकटी चाटे, निसार अहेमद, पठाण मुसा खान युनूस खान, पठाण सरफराज खान मेहताब खान, यशश्री पाटील, दामोदर पंडित, बजरंग दिगंबर सोनवणे, मुजीब नईमोद्दीन इनामदार, राजेशकुमार भडागळे, विजय साळवे, शेषेराव वीर, अ‍ॅड. शरद कांबळे, शिवाजी कवठेकर, शेख याशेद तय्यब, शेख सादेक शेख इब्राहिम, सय्यद मिनहाज, साजन रईस चौधरी,
संवेदनशील मतदारसंघ
गेवराई विधानसभा- मानमोडी, सैदापूर, वडगाव ढोक, मिरकळा, वंजारवाडी, एरंडगाव
माजलगाव विधानसभा - गुजरवाडी, सुनरवाडी
बीड विधानसभा - राजुरी न., खांबा, गवळवाडी
आष्टी विधानसभा - देविगव्हाण, तोलावाडी, झापेवाडी, जामगाव (२), आंधळेवाडी, बोरोडी
परळी विधानसभा - नाथ्रा, पांगरी, लिंबोटा, बेलंबा, गडदेवाडी, सोनहिवरा, कन्हेरवाडी (उत्तर), कन्हेरवाडी (दक्षिण), कन्हेरवाडी (पश्चिम), मांडवा, नंदागौळ, दैठणाघाट (पूर्व), दैठणाघाट (पश्चिम), चोपरवाडी, सौंदणा, हातोला (पश्चिम बाजू), बर्दापूर (उत्तर बाजू)
केज मतदारसंघ -निवडुंगवाडी, तुकूची वाडी

Web Title: Who is the MP of the Beed Lok Sabha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.