माजलगाव धरणाची पाणी पातळी फूटभर वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:03 AM2019-01-15T00:03:30+5:302019-01-15T00:04:42+5:30

माजलगाव धरणाची पाणी पातळी मृतसाठ्या खाली गेल्याने बीड व माजलगाव शहराला पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार होणार होती, मात्र नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी सोडल्यामुळे पाणी पातळी एक फुटाने वाढली असून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्याता आहे.

The water level of the Majalgaon dam has increased | माजलगाव धरणाची पाणी पातळी फूटभर वाढली

माजलगाव धरणाची पाणी पातळी फूटभर वाढली

Next
ठळक मुद्देआणखी एका आवर्तनाची गरज : नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यात सोडले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : माजलगाव धरणाचीपाणी पातळी मृतसाठ्या खाली गेल्याने बीड व माजलगाव शहराला पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार होणार होती, मात्र नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी सोडल्यामुळे पाणी पातळी एक फुटाने वाढली असून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्याता आहे. मात्र आणखी एका आवर्तनाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
२१ डिसेंबर पासून जायकवाडी धरणातून पैठणच्या उजव्या कालव्याद्वारे पाणी माजलगाव धरणामध्ये सोडण्यात आल्याने तेवीस दिवसात धरणाची पाणी पातली फूटभर वाढली आहे. जुलै महिन्यापासून पावसानं पाठ फिरवल्याने येथील माजलगाव धरण मृतसाठ्यातच होते.
तालुक्यात हिवाळ्यातही पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्याने प्रशासनाने उन्हाळ्यात माजलगाव धरणामध्ये पिण्यासाठी पाणी आरक्षित केले होते. मात्र जायकवाडी धरणातून पैठणच्या उजव्या कालव्याद्वारे २१ डिसेंबर पासून पाणी सोडण्यात आले होते.
मात्र, सोडलेल्या पाण्याचा अवैध उपसा आणि कॅनॉलला जागोजागी लागलेली गळती यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होवून तेवीस दिवस होऊन देखील माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर आले नसून, धरणाची पाणीपातळी केवळ एक फुटाने वाढली आहे.
२४ डिसेंबर रोजी माजलगाव धरणाची पाणीपातळी ४२४.७८ मीटर एवढी होती तर पाणीसाठा १०३.६० एवढा होता. तर १४ जानेवारी रोजी पाणी पातळी ४२५.०६ मीटर एवढी असून पाणीसाठा १११.२० दलघमी आहे. आजपर्यंत ९.५४९ दलघमी एवढा पाणीसाठा वाढला असल्याची माहिती धरण मुकादम एस.डी कुलकर्णी यांनी दिली. मात्र आलेल्या या पाण्यामुळे काही प्रमाणात दिलासा जरी मिळाला असला तरी देखील पाणीसंकटाची टांगती तलावार माजलगाव, बीड व या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या इतर शहरांवर आहे. त्यामुळे अजून एक पाण्याचे आवर्तन करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होऊन उन्हाळ््याच्या दिवसात देखील दिलासा मिळेल.

Web Title: The water level of the Majalgaon dam has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.