कचऱ्यावरून बीडमध्ये नागरिक-पालिकेत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:42 AM2018-06-28T00:42:36+5:302018-06-28T00:42:59+5:30

ओला व सुका कचरा वेगवेगळा द्या आणि शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पुढे या, असे आवाहन करत डोअर टू डोअर जाणाºया नगर पालिका कर्मचाºयांसोबत काही नागरिक वाद घालत असल्याचे समोर आले आहे. कचरा वेगवेगळा देण्यात त्यांना कमीपणा वाटत असून तुम्हीच कचरा वेगळा करा नाही तर आम्ही आमचा कचरा कोठेपण टाकू, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून समोर येत आहेत. यावरून नागरिक शहर स्वच्छतेसाठी किती पुढाकार घेतात, हे दिसून येते. काही नागरिकांच्या असहकार्यामुळेच स्वच्छ शहर ‘घाण’ बनत चालले असून यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.

From the waste to the people of Beed, the citizen-bound in the police | कचऱ्यावरून बीडमध्ये नागरिक-पालिकेत जुंपली

कचऱ्यावरून बीडमध्ये नागरिक-पालिकेत जुंपली

googlenewsNext
ठळक मुद्देओला व सुका कचरा करण्यात कमीपणा; ‘इगो प्रॉब्लेम’ मुळे तू तू मैं मैं... !

बीड : ओला व सुका कचरा वेगवेगळा द्या आणि शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पुढे या, असे आवाहन करत डोअर टू डोअर जाणाºया नगर पालिका कर्मचाºयांसोबत काही नागरिक वाद घालत असल्याचे समोर आले आहे. कचरा वेगवेगळा देण्यात त्यांना कमीपणा वाटत असून तुम्हीच कचरा वेगळा करा नाही तर आम्ही आमचा कचरा कोठेपण टाकू, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून समोर येत आहेत. यावरून नागरिक शहर स्वच्छतेसाठी किती पुढाकार घेतात, हे दिसून येते. काही नागरिकांच्या असहकार्यामुळेच स्वच्छ शहर ‘घाण’ बनत चालले असून यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.

बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नगर पालिकेकडून कडक पाऊले उचलले जात आहेत. सकाळी पाच वाजेपासूनच सर्व अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरून स्वच्छतेचा आढावा घेत आहेत. तसेच मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी प्रत्येक प्रभागात विशेष पथके नियुक्त केले आहेत. या पथकांकडून ओला व सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात आवाहन करण्याबरोबरच नागरिकांना माहिती दिली जात आहे. तोटे - फायदे सांगितले जात आहेत. तसेच ज्याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. त्यावर तात्काळ कार्यवाहीही केली जात असल्याचे दिसून येते. परंतु काही नागरिक या उपक्रमांत खोडा घालत असल्याचे दिसून येत आहे. पालिकेला सहकार्य करण्याऐवजी ओला व सुका कचरा वेगळा करण्यावरून त्यांच्यासोबत वाद घालत असल्याचे दिसून येत आहे.

खडकपु-यामध्ये झाली बाचाबाची
पेठ बीड भागातील खडकपुरा येथे बुधवारी सकाळी पालिका अधिकारी, कर्मचारी कचरा वेगळा करून घेण्याचे आवाहन करीत होते. एवढ्यात काही नागरिकांनी एकत्र कचरा आणून घंटा गाडीत टाकला.
यावर अधिकाºयांनी त्यांना रोखले असता ‘तुम्ही ओला व सुका कचरा वेगळा करा, नसेल घेऊन जायचा तर नका घेऊन जाऊ, आम्ही टाकू कोठेपण’ असे म्हणत वाद घातला.
यावरून पालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. यावरून नागरिकांकडून या मोहिमेत आणखीही अपेक्षेप्रमाणे सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

दंडाची धमकी; वाद घालणारे गायब
कचरा वेगळा करून व इतरत्र कचरा टाकणाºयांना पालिका अधिकाºयांनी कारवाईची धमकी देताच सर्व गायब झाल्याचे दिसून येते. काही नागरिकांच्या अशा वर्तणुकीमुळेच शहर अस्वच्छ होत असल्याचे दिसून येते.

काही नागरिकांकडून सहकार्य
काही भागात नागरिक घरातच ओला व सुका कचरा वेगवेगळा करून पालिकेच्या घंटागाडीत टाकतात. तसेच इतरांनाही सांगतात. याचा आदर्श घेण्याची गरज असून शहर स्वच्छतेसाठी पालिकेला सहकार्य करावे. फायदा आपल्यालाच असल्याचे पालिकेकडून सांगितले जात असल्याने अनेकांची मानसिकता बदलली आहे.

सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत कर्तव्य
सकाळी सहा वाजताच मुख्याधिकारी ते शिपाई असे सर्वच स्वच्छतेच्या कामासाठी बाहेर पडतात. सकाळी जनजागृती करून झाल्यावर दिवसभर कार्यालयीन काम करतात. एरव्ही १०.३० ते ६ असा कार्यालयाचा वेळ आहे. परंतु सध्या हे लोक १२ तास कर्तव्य बजावत आहेत.
स्वच्छतेचा सोशल मीडियावरून आढावा
मुख्याधिकारी डॉ.जावळीकर यांनी पथके नियूक्त केली आहेत. त्यांचा सोशल मीडियावर ‘मिशन २०१९’ असा ग्रुप तयार करून त्यावर दररोज आढावा घेतला जात आहे. तसेच स्पॉटवर गेल्यानंतर सेल्फी काढण्याची तंबी दिल्याने कामचुकारांना आळा बसला आहे. तसेच जे गैरहजर आहेत, त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जात आहे.

कामगार महिलेला धक्काबुक्की
ओला व सुका कचरा एकत्र घेतला नाही, म्हणून एका घंटागाडी चालक महिलेला उच्चभ्र वसाहतीतील एका महिलेने धक्काबुक्की केली. ही घटना दोन दिवसांपूर्वी सुभाष रोड परिसरात घडली होती.
हा प्रकार समजताच स्वच्छता निरीक्षकांनी धाव घेतली होती. परंतु सदरील महिलेवर कसलीच कारवाई न करता हे प्रकरण दडपले. पालिका कर्मचा-यांना काही नागरिकांकडून तुच्छ वागणूक मिळत असल्याने त्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे.

Web Title: From the waste to the people of Beed, the citizen-bound in the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.