बीडमधील बालाजी मंदिरात मुक्ताईची पालखी विसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:01 AM2018-07-11T01:01:50+5:302018-07-11T01:02:09+5:30

बीड : मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्री मुक्ताबाई पालखीने सोमवारी येथील माळीवेस हनुमान मंदिरात विसावा घेतल्यानंतर मंगळवारी आरती व हरिपाठानंतर पालखी सोहळ्याचे शहरातील पारंपरिक मार्गाने पेठेतील बालाजी मंदिराकडे प्रस्थान झाले.

Vibhuti's palanquin in Balaji temple in Beedi | बीडमधील बालाजी मंदिरात मुक्ताईची पालखी विसावली

बीडमधील बालाजी मंदिरात मुक्ताईची पालखी विसावली

Next

बीड : मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्री मुक्ताबाई पालखीने सोमवारी येथील माळीवेस हनुमान मंदिरात विसावा घेतल्यानंतर मंगळवारी आरती व हरिपाठानंतर पालखी सोहळ्याचे शहरातील पारंपरिक मार्गाने पेठेतील बालाजी मंदिराकडे प्रस्थान झाले.

सोमवारी बीड शहरात आगमन व स्वागतानंतर पालखी हनुमान मंदिरात विसावली होती. दुपारपासून मंगळवारी सकाळपर्यंत भाविकांनी दर्शन घेतले. पालखीत सहभागी वारकऱ्यांचे स्थानिक भाविकांनी आदरातिथ्य केले. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आरतीनंतर संत मुक्ताई, हरिनामाचा गजर करत फुलांनी सजविलेल्या रथातून पालखी धोंडीपुºयातून मार्गस्थ झाली. शेकडो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
पालखीच्या अग्रभागी जनार्दन दोडके, देवीदास दोडके यांच्या बॅँड पथकांनी वातावरण प्रफुल्लीत केले.

देशभक्तीपर तसेच धार्मिक गितांच्या धुन भाविकांच्या कानी पडत होत्या. दोन्ही बॅँड पथक अनेक वर्षांपासून निस्सीम भक्ती आणि अपार श्रध्देपोटी पालखीच्या सेवेत वाद्यवृंदाच्या माध्यमातून सुरतालांची बरसात करत असतात.

पाहुणचाराचा ‘आदर्श’
संत श्री मुक्ताबाई पालखीतील वारकºयांसाठी शहरातील कबाड गल्लीतील भाविकांकडून महापंगत आयोजित केली जाते. १८५२ पासून मराठा पंच कमिटीच्या माध्यमातून सुरु असलेली अशी सेवा या भागातील तरुणांच्या आदर्श मित्र मंडळाने सुरु ठेवली आहे. बाळासाहेब जाधव, बंडू कदम, राजेंद्र सोळुंके, अशोक रोमण, संतोष जाधव, बाळासाहेब गोरे, बबन जाधव, बाळू कदम आदींच्या सहभागातून ३५० वारकरींच्या निवास व जेवणाची व्यवस्था केली जाते.

आरोग्य तपासणी
बीड येथील कै. किसनराव जाधव सेवाभावी संस्थेच्या वतीने संत मुक्ताई पालखीतील वारकºयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. अजित जाधव, डॉ. सुहासिनी जाधव, डॉ. सतिश लड्डा, डॉ. धनंजय रामदासी, महेश कागदे यांनी रुग्णसेवा दिली. डॉ. रामदासी यांच्या वतीने मोफत औषधी देण्यात आली. संतोष जाधव, राहुल कागदे, पंकज खंडेलवाल, बाळु शिंदे, देवीसिंह शिंदे, नितीन दोडके, किशोर पिसाळ, आनंद गायकवाड, आतिश मेखे यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले

Web Title: Vibhuti's palanquin in Balaji temple in Beedi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.