दुचाकी, रिक्षाच्या धडकेत दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:05 AM2019-02-22T00:05:36+5:302019-02-22T00:05:55+5:30

तालुक्यातील दोन ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटना ढेकणमोहा व काकडहिरा येथे घडल्या. दुचाकी घसरल्याने तरुणाचा तर रिक्षाने धडक दिल्याने उपचार घेताना एका वृद्धाचा मृत्यू झाला.

Two wheelers, a two-wheeler rickshaw | दुचाकी, रिक्षाच्या धडकेत दोघे ठार

दुचाकी, रिक्षाच्या धडकेत दोघे ठार

Next

बीड : तालुक्यातील दोन ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटना ढेकणमोहा व काकडहिरा येथे घडल्या. दुचाकी घसरल्याने तरुणाचा तर रिक्षाने धडक दिल्याने उपचार घेताना एका वृद्धाचा मृत्यू झाला.
अनंत आश्रुबा सोळंके (३२ रा.ढेकणमोहा, ता.बीड) असे दुचाकी घसरुन गंभीर जखमी होऊन मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ढेकणमोहा येथील रामदास बबन काळे व अनंत सोळंके हे दोघे बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन (क्र. एम.एच.२३ ए.व्ही. ७७०८) घाटसावळी येथून ढेकणमोह्याकडे येत होते. घाटसावळीच्या कमानीजवळ दुचाकी अचानक घसरली यात मागे बसलेल्या अनंत सोळंके या तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागला तर रामदास किरकोळ जखमी झाला. उपचारासाठी दोघांनाही बीड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिथे उपचार घेताना बुधवारी सायंकाळी अनंत सोळंके या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचे सासरे कोंडीराम बागलाने यांच्या खबरीवरुन रुग्णालय पोलीस चौकीत घटनेची नोंद करण्यात आली.
अपघाताची दुसरी घटना बीड तालुक्यातील काकडहिरा फाट्याजवळ रविवारी सकाळी घडली. वैजनाथ अप्पासाहेब बागलाने (६५ रा.काकडहिरा) यांना रस्त्यावरुन जाणाऱ्या भरधाव रिक्षाने जोराची धडक दिली. यात ते गंभीररीत्या जखमी झाले.
उपचारासाठी त्यांना तातडीने बीड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार घेताना गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आल्याची माहिती सहायक फौजदार बब्रुवाहन गांधले यांनी सांगितले.

Web Title: Two wheelers, a two-wheeler rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.