परळीचे दोन संच बंद; ५३४ मेगावॅटची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:55 PM2017-11-24T23:55:35+5:302017-11-24T23:55:38+5:30

नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मे.वॅ.क्षमतेचे क्र . ७ व ८ हे दोन संच बंद ठेवण्यात आले असून केवळ संच क्रमांक ६ हा एकच संच सुरु होता. शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास २१६ मे.वॅ. विज निर्मिती चालू होती, तर दोन संच बंद असल्याने ५३४ मेगावॅट विजेची तूट जाणवली.

 Two sets of Parli closed; 534 MW deficit | परळीचे दोन संच बंद; ५३४ मेगावॅटची तूट

परळीचे दोन संच बंद; ५३४ मेगावॅटची तूट

googlenewsNext

परळी : नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मे.वॅ.क्षमतेचे क्र . ७ व ८ हे दोन संच बंद ठेवण्यात आले असून केवळ संच क्रमांक ६ हा एकच संच सुरु होता. शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास २१६ मे.वॅ. विज निर्मिती चालू होती, तर दोन संच बंद असल्याने ५३४ मेगावॅट विजेची तूट जाणवली.

तालुक्यातील दाऊतपुर परिसरातील नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मे.वॅ.क्षमतेचा संच क्र. ८ शुक्र वारी दुपारी तांत्रिक कारणामुळे बंद ठेवण्यात आला. तर २५० मे.वॅ. क्षमतेचा संच क्र .७ हा तीन दिवसांपूर्वी कोळसा टंचाईचे कारण पुढे करून बंद ठेवण्यात आल्याचे समजते. संच क्र. ८ हा बंद पडण्याचे प्रकार वाढत आहेत. जे अधिकारी संच क्र. ८ उभारणीच्या वेळी होते तेच अधिकारी आता संच क्र. ८ हा कार्यान्वित झाल्यानंतरही आहेत. त्यामुळे हा संच बंदच कसा पडतो? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याच्या चौकशीची मागणी माजी उपनगराध्यक्ष रविंद्र परदेशी यांनी केली

संच क्र.८ हा तांत्रिक कारणामुळे २ दिवसांसाठी बंद ठेवला. दोन दिवसाच्या दुरूस्तीनंतर हा संच पुन्हा कार्यान्वित होईल व संच क्र.७ हा तीन दिवसांपूर्वी कोळशाच्या टंचाईमुळे बंद ठेवल्याची माहिती औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title:  Two sets of Parli closed; 534 MW deficit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.