बीडमध्ये शिक्षिकेने बाथरूममध्ये कोंडून घेत स्वत:ला पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 05:03 PM2019-04-06T17:03:27+5:302019-04-06T17:03:57+5:30

घरगुती कारणावरून पेटवून घेतल्याची चर्चा

A teacher in Beed locked herself in the bathroom and got herself burn | बीडमध्ये शिक्षिकेने बाथरूममध्ये कोंडून घेत स्वत:ला पेटविले

बीडमध्ये शिक्षिकेने बाथरूममध्ये कोंडून घेत स्वत:ला पेटविले

Next

बीड : खाजगी शाळेत नौकरी करणाऱ्या एका शिक्षिकेने आई-वडील घरी नसताना स्वत:ला बाथरूमध्ये कोंडून घेत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये ती जवळपास ९५ टक्के भाजली आहे. तिला जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास बीड शहरातील संत नामदेवनगर भागात घडली. घरगुती कारणावरून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. ठाण्यात अद्याप याची नोंद नाही.

प्रतीक्षा गौतम जाधव (२५ रा.संत नामदवेनगर, बीड) असे पेटवून घेतलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. प्रतिक्षा यांचे डीएडचे शिक्षण झालेले असून बीडमधीलच एका खाजगी शाळेत त्या नौकरीला होत्या. मागील काही दिवसांपासून त्या तणावात होत्या. प्रतिक्षा यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. त्यांची आई ही प्रतिक्षाच्या मोठ्या बहिणीकडे गेली होती तर वडील कामगार असल्याने कामावर गेले होते. घरात त्यांचा लहान भाऊ एकटाच होता. 

हीच संधी साधून प्रतिक्षा या बाथरूमध्ये गेल्या. त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत स्वत: ला पेटवून घेतले. चटके बसल्यानंतर प्रतिक्षा जोरात ओरडल्या. त्यामुळे लहान भाऊ प्रतिक्ष हा तिथे धावला. दरवाजा बंद असल्याने त्याने बाजुच्या लोकांना आवाज दिला. त्यांनी दरवाजा तोडून पाणी टाकत तिला विझविले. त्यानंतर पोलिसांना पाचारण केले. पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. या मध्ये ती जवळपास ९५ टक्के भाजली असून प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, उशिरापर्यंत या प्रकरणाची शिवाजीनगर ठाण्यात नोंद झालेली नव्हती. पोनि पुरभे म्हणाले, मुलीच्या जबाबावरूनच पुढील कारवाई केली जाईल. पेटवून घेण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. चौकशी सुरू केली आहे.

Web Title: A teacher in Beed locked herself in the bathroom and got herself burn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.