The teacher attacks on teacher wife due to she took early dinner | अगोदर जेवल्याने शिक्षक पत्नीचे बुक्कीत दात पाडले; शिक्षक पतीवर गुन्हा दाखल
अगोदर जेवल्याने शिक्षक पत्नीचे बुक्कीत दात पाडले; शिक्षक पतीवर गुन्हा दाखल

बीड : अगोदर जेवल्याने शिक्षक असलेल्या ५० वर्षीय पत्नीच्या तोंडावर बुक्की मारुन समोरील दात पडल्याची धक्कादायक घटना धारुर शहरातील उदयनगर भागात ७ जानेवारीस घडली. याप्रकरणी शिक्षक पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अनुरथ मारुती मोरे (तेलगाव, ता. धारुर, ह. मु. उदयनगर, धारुर) असे मारहाण करणाऱ्या शिक्षक पतीचे नाव आहे. अनुरथ हा चोंडी गावातील वस्तीवर शिक्षक आहे, तर त्याची पत्नी गावंदरा येथील जि. प. शाळेवर शिक्षिका आहेत. ७ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता शिक्षिकेने भाऊ आल्यामुळे त्याच्यासोबत जेवण केले. नोकरीवरुन आलेल्या अनुरथला पत्नी आपल्या अगोदर जेवल्याचा राग अनावर झाला. त्याने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यातच त्याची एक बुक्की तोंडावर बसल्याने शिक्षक पत्नीचे समोरील दात पडले. एवढ्यावरच न थांबता त्यानंतर तिला मुलासह घराबाहेर हाकलून दिले. 

उपचार घेतल्यानंतर १० जानेवारी रोजी शिक्षक पत्नीने धारुर पोलीस ठाणे गाठून अनुरथ विरोधात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. अद्यापही शिक्षक पतीला अटक झालेली नाही. सहाय्यक फौजदार आर. के. जाधव हे तपास करीत आहेत.


Web Title: The teacher attacks on teacher wife due to she took early dinner
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.