कर भरणाऱ्यांना ग्रा.पं.तर्फे दळण मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:15 AM2018-07-05T00:15:25+5:302018-07-05T00:16:34+5:30

दोन दशकापासून अविरत परिश्रम घेऊन गावच्या एकीच्या बळातून साकार झालेल्या ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ या संकल्पनेला मूर्त स्वरुप झाल्यानंतर आणि जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून डंका वाजल्यानंतर कुसळंबकरांनी एक पाऊल पुढे टाकत गावक-यांसाठी मोफत दळण पिठ देण्यासाठी सार्वजनिक गिरणीचे लोकार्पण सीईओ अमोल येडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार आदिंच्या उपस्थितीत झाले.

Taxpayer gets free from taxpayers free of cost | कर भरणाऱ्यांना ग्रा.पं.तर्फे दळण मोफत

कर भरणाऱ्यांना ग्रा.पं.तर्फे दळण मोफत

Next
ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील आदर्श गाव कुसळंब ग्रा.पं.चे एक पाऊल पुढे : स्वउत्पन्नातून उभारली सार्वजनिक पिठाची गिरणी

अनिल गायकवाड।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुसळंब : दोन दशकापासून अविरत परिश्रम घेऊन गावच्या एकीच्या बळातून साकार झालेल्या ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ या संकल्पनेला मूर्त स्वरुप झाल्यानंतर आणि जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून डंका वाजल्यानंतर कुसळंबकरांनी एक पाऊल पुढे टाकत गावक-यांसाठी मोफत दळण पिठ देण्यासाठी सार्वजनिक गिरणीचे लोकार्पण सीईओ अमोल येडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार आदिंच्या उपस्थितीत झाले.
पाटोदा तालुक्यातील कुसळंब या गावात ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम योजना, स्मार्ट व्हिलेज आदींसह योजनेत सहभागी होऊन जिल्ह्यात आपले नावलौकिक केले. जलशुद्धीकरण प्रकल्प, सामूहिक विवाह, शंभर टक्के शौचालय, गावभर रस्ते, वृक्षारोपण, स्वच्छता, शांतता, भूमिगत गटार, तंटामुक्ती, उद्योग व्यवसायाठी ५० गाळे, व्यसनमुक्तीसाठी पुढाकार आदींसह सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम या गावांचे वैशिष्ट्ये ठरले आहेत. सर्वसाधारण व महिला बचतगट, बँक सुविधा, पेपरलेस ग्रामपंचायत, शेतकरी मार्गदर्शन आदी उपक्रम सातत्याने येथे राबविले जात आहेत. यापुढे आणखी एक पाऊल टाकत ग्रामपंचायतने स्वउत्पन्नातून पिठाची गिरणी सुरू केली आहे. नळपट्टी, घरपट्टी आदी करांची पूर्तता करणाºया कुटुंबांना या पिठाच्या गिरणीवर मोफत दळण देण्याचा प्रारंभ केला. यावेळी बीडीओ राजेंद्र मोराळे, गटशिक्षणाधिकारी गव्हाणे, जि.प. सदस्य माऊली जरांगे, सरपंच मोहिनी पवार, संतोष पवार, जि.प.चे माजी सदस्य शिवनाथ पवार, आबासाहेब पवार, महादेव पवार, गोरख पवार, ग्रामसेवक लोमटेसह ग्रामस्थ, महिला यावेळी उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या परिश्रमाला पाठबळ देणार
कुसळंब येथील गावकरी एकत्र येऊन सर्वांच्या भल्यासाठी शासकीय योजनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतात. गावचा विकास हा राष्टÑाचा विकास असतो. त्यामुळे ग्रामस्थांच्या अशा उपक्रमांना शासनाचे सदैव पाठबळ मिळवून देऊ, असे सीईओ अमोल येडगे यावेळी म्हणाले.
गावातील सर्वांनी विकासाच्या मुद्यावर एकत्र येत उपक्रम राबविले. ग्रा.पं. पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांच्या एकी आणि कष्टातून मिळालेले हे यश आहे, ही एकीच्या बळाची जादू असल्याचे सरपंच मोहिनी पवार म्हणाल्या.

Web Title: Taxpayer gets free from taxpayers free of cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.