Study tour of farmers for Mysore training in Mussoorie | तुती प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांचा म्हैसूर येथे अभ्यास दौरा
तुती प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांचा म्हैसूर येथे अभ्यास दौरा

बीड: केज तालुक्यातील युसूफवडगाव येथील २० शेतकºयांचा गट तुतीे संगोपनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी १४ जूनपासून कर्नाटकमधील म्हैसूर सिल्क बोर्ड येथे अभ्यास दौ-यावर गेला आहे. कृषीच्या ‘आत्मा’ विभागाच्या माध्यमतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

जिल्ह्यामध्ये कापूस, सोयाबीन, ऊस, कडधान्ये ही प्रमुख पिके आहेत. मात्र, या पिकांना फाटा देत काही शेतकºयांनी नवीन प्रयोग करत तुती लागवड करून रेशीम उत्पादनाकडे वळले आहेत. तुतीसंदर्भात तंत्रशुद्ध माहिती न मिळाल्यामुळे उत्पादनावर परिणान होत होता, काही शेतक-यांना आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागले होते. झालेल्या नुकसानाविषयी युसूफवडगाव येथील तुती उत्पादक शेतक-यांनी कृषी विभागाला माहिती दिली. त्यानंतर या शेतक-यांना ‘आत्मा’च्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आला. अभ्यास
दौ-यावर २० शेतकरी व कृषी विभागाचे दोन अधिकारी म्हैसूर येथे रेशीम उत्पादन प्रशिक्षणासाठी गेले आहेत.

सिल्क बोर्ड म्हैसूर येथे शेतकºयांना तुतीचे योग्य संगोपन, तसेच अंडकोष निर्मितीपासून रेशीम किटक संगोपन करणे व कोष निर्मिती करून उत्पादन वाढवणे याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच या प्रशिक्षण केंद्रातील प्रयोगशाळेत शेतक-यांनी स्वत: प्रात्यक्षिके केली. निर्माण होणाºया रेशीम उत्पादनाला कोणती बाजारपेठ उत्तम आहे, या विषयी देखील शेतक-यांना माहिती देण्यात येत आहे. २५ जुनला ते परतणार आहेत.

पारंपरिक पिकांना फाटा देत तुतीचे उत्पादन घेणा-या शेतकºयांना या प्रशिक्षणाचा फायदा होणार आहे. जिल्ह्यात रेशीमचे उत्पादन वाढले तर शेतकºयांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.


Web Title: Study tour of farmers for Mysore training in Mussoorie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.