कोळगाव येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:26 AM2019-01-12T00:26:03+5:302019-01-12T00:27:28+5:30

तालुक्यातील कोळगाव येथील ३३ केव्ही केंद्राचे काम सुरू करावे, गेवराईसह शिरु र कासार व बीड तालुक्यासाठी वरदान ठरणारा निमगांव (मायंबा) या रखडलेल्या प्रकल्पाचे काम तात्काळ सुरु करावे,

Stop the road in Kollgaon | कोळगाव येथे रास्ता रोको

कोळगाव येथे रास्ता रोको

Next
ठळक मुद्देनिमगाव (मायंबा) प्रकल्प, कोळगाव ३३ केव्ही वीजकेंद्र, चारा छावण्या सुरू करा

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील कोळगाव येथील ३३ केव्ही केंद्राचे काम सुरू करावे, गेवराईसह शिरु र कासार व बीड तालुक्यासाठी वरदान ठरणारा निमगांव (मायंबा) या रखडलेल्या प्रकल्पाचे काम तात्काळ सुरु करावे, चारा छावण्या सुरु कराव्यात यासह आदी मागण्यासाठी शुक्रवारी तालुक्यातील कोळगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
तालुक्यातील कोळगाव येथे ३३ केव्ही वीजकेंद्र मंजूर आहे. मात्र या वीजकेंद्राचे काम अद्यापही सुरु झाले नसून, यामुळे शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासकीय पातळीवर या वीज केंद्राचे काम सुरु होण्यास विलंब होत आहे. तरी या वीज केंद्राचे काम तात्काळ करण्यात यावे तसेच शिरुर तालुक्यातील निमगाव (मायंबा) हा प्रकल्प दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारा असून या प्रकल्पाचे काम करण्यात यावे हा प्रकल्प झाल्यास गेवराई तालुक्यातील चकलांबा, मादळमोही, पाचेगाव, सिरसदेवी व जातेगाव या जि.प. सर्कलचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. तसेच गेवराईसह शिरुर व बीड या भागातील हजारो हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. मात्र प्रकल्पाला राजकीय उदासीनता असल्याने हा प्रकल्प रेंगाळल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. भीषण दुष्काळ असल्यामुळे शासनाने चारा छावण्या तात्काळ चालू कराव्यात, या मागण्यांसाठी कोळगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन केले.
दरम्यान, आंदोलनस्थळी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, चकलांबा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनात अ‍ॅड. उध्दव रासकर, रासपा जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे, माजी सभापती पंढरीनाथ लगड, मनसे तालुकाध्यक्ष जयदीप गोल्हार, तुकाराम तळतकर, अनिरूध्द लोंढे, जयदत्त बनसोडे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Stop the road in Kollgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.