मानवी हक्क अभियानचा माजलगावात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:30 AM2019-04-28T00:30:32+5:302019-04-28T00:32:29+5:30

सोशल मिडियाच्या माध्यमातून कपिल सरोदे याने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी अपशब्द वापरून साठे यांच्या अनुयायांचे मन दुखावले आहे. कपिल सरोदेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Stop the mahalgawa route of human rights campaign | मानवी हक्क अभियानचा माजलगावात रास्ता रोको

मानवी हक्क अभियानचा माजलगावात रास्ता रोको

googlenewsNext
ठळक मुद्देसोशल मीडियाचा गैरवापर । दोषीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी

माजलगाव : सोशल मिडियाच्या माध्यमातून कपिल सरोदे याने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी अपशब्द वापरून साठे यांच्या अनुयायांचे मन दुखावले आहे. कपिल सरोदेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सरोदे याने अत्यंत खालची पातळी गाठून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून अपमानित केले आहे. त्यामुळे कपिल सरोदे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अटक न केल्यास मानवी हक्क अभियानच्या वतीने संपूर्ण ताकदीनिशी महाराष्टÑभर आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला.
यावेळी शिवाजी सुतार, दत्ता कांबळे, प्रदिप तांबे यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला. रास्ता रोकोमध्ये मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे, मधुकर कांबळे, छगन क्षीरसागर, अप्पा भारस्कर, अशोक ढगे, विवेक जाधव, अनिकेत वाघमारे, अक्षय आठवे, आनंद घडसिंगे, बबलू भारस्कर, आकाश हातागळे, बाबासाहेब लोखंडे, खंडू खंडागळे, महादेव उमाप, मच्छिंद्र उफाडे, यांचेसह अनेकजण सहभागी झाले होते. याप्रकरणी प्रशासनाने लक्ष घालून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत, याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली

Web Title: Stop the mahalgawa route of human rights campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.