टँकरच्या खेपा वाढवण्याचे राज्य सरकारचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:22 AM2019-04-26T00:22:43+5:302019-04-26T00:23:38+5:30

दुष्काळी स्थितीत सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा हा २०११ च्या जनगणनेनूसार होत आहे. मात्र २०१९ ची लोकसंख्या ग्राह्य धरून पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता राज्यात १०% वाढ ग्राह्य धरून टँकर पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

State government orders to increase tanker fodder | टँकरच्या खेपा वाढवण्याचे राज्य सरकारचे आदेश

टँकरच्या खेपा वाढवण्याचे राज्य सरकारचे आदेश

Next
ठळक मुद्देलोकसंख्येनुसार १० टक्के वाढ गृहित धरून टँकर खेपा वाढणार

बीड :दुष्काळी स्थितीत सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा हा २०११ च्या जनगणनेनूसार होत आहे. मात्र २०१९ ची लोकसंख्या ग्राह्य धरून पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता राज्यात १०% वाढ ग्राह्य धरून टँकर पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संपूर्ण राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून बीड जिल्ह्यात सततचा पडणारा दुष्काळ आणि घटलेली पाण्याची पातळी लक्षात घेता टँकरची संख्या वाढवणे गरजेची होती. दोन दिवसांपूर्वी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन टँकरच्या खेपा वाढवण्याची मागणी केली होती, टँकरद्वरे कुंडलीका प्रकल्पातून पाणी पुरवठा केल्यास पिण्याच्या पाण्याची सोय होईल अशी देखील मागणी आ. क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता आहे त्या लोकसंख्येच्या तुलनेत १० % वाढ गृहीत धरून संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात ज्या ठिकाणी टँकर सुरु आहेत, त्या ठिकाणी संख्या वाढवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. टँकरच्या खेपा वाढवाव्यात अशी मागणी अनेक गावातील ग्रमस्थांनी आ. क्षीरसागर यांच्याकडे केली होती.

Web Title: State government orders to increase tanker fodder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.