घटस्थापनेने योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 06:51 PM2018-10-10T18:51:13+5:302018-10-10T18:51:20+5:30

श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास आज सकाळी नऊ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला.

Start of Yogeshwari Devi's Navratri Festival by Ghatsthapna | घटस्थापनेने योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

घटस्थापनेने योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

googlenewsNext

अंबाजोगाई (बीड ) :  महाराष्ट्राचे शक्तीपीठ  व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास आज सकाळी नऊ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. तहसीलदार  संतोष रूईकर  व सौ. कमल संतोष रूईकर यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. महापूजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

१० आॅक्टोबर ते १८ आॅक्टोबर या कालावधीत  श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. आज सकाळी मंदिरात घटस्थापना व महापुजेने महोत्सवास प्रारंभ झाला. तसीलदार संतोष रूईकर व सौ. कमल संतोष रूईकर यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. या महापुजेसाठी सचिव भगवानराव शिंदे, देवीचे पृथ्वीराज पुजारी, कृष्णा पुजारी, विश्वस्त, माजी आ. पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, अ‍ॅड. शरद लोमटे, गिरधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा राम  कुलकर्णी यांच्यासह पुरोहित,  मानकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली. घटस्थापनेनंतर श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महिला व भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवल कमिटीच्या वतीने सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

विविध उपक्रमांची रेलचेल
श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने बुधवारपासून मंदिर परिसरात कीर्तन, प्रवचन, भजन आदि उपक्रम सुरू झाले आहेत. आज दुपारी अंबाजोगाई येथे सहयोग महिला भजनी मंडळ, सोमेश्वर महिला भजनी मंडळ, संकटमोचन महिला भजनी मंडळ, वीरशैव महिला भजनी मंडळ, सत्संग महिला भजनी मंडळ, मुक्ताई महिला भजनी मंडळ, लक्ष्मीनारायण महिला भजनी मंडळ, दत्त मंदिर महिला भजनी मंडळ यांच्या संगित भजनाचा कार्यक्रम झाला. तर मुकुंदराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. श्रीकिसन महाराज पवार यांचे किर्तन झाले. यावेळी त्यांना वादनासाठी श्रीनिवास जगताप, प्रविण सलगर, व्यंकट धायगुडे, दामु भालेकर, माणिक तळणीकर, दीपक अदाटे, मुकुंद पवार यांनी साथसंगत केली. या सर्व उपस्थितांचे कलावंतांचे स्वागत योगेश्वरी देवल कमिटीचे विश्वस्त उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, पूजा कुलकर्णी, गौरी जोशी यांनी केले. 
 

Web Title: Start of Yogeshwari Devi's Navratri Festival by Ghatsthapna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.